मन आणि मनाचे आजार- (भाग दोन)-डॉ. नरेंद्र दाभोलकर/Dr Narendra Dabholkar Speech

96.2 هزار بار بازدید - 2 سال پیش - मनाची माहिती नसल्याने मनाचे आजार
मनाची माहिती नसल्याने मनाचे आजार हे अजूनदेखील माणसाला नेहमी बुचकळ्यात टाकणारी गूढ दुखणी ठरत आले आहेत. मेंदूद्वारे होणाऱ्या मनाच्या रचनेचे व कार्याचे पूर्ण ज्ञान सर्वसामान्य माणसाला नसते. यामुळे मानसिक आजाराविषयी त्याला नेहमीच आश्चर्य व भीती वाटत आली आहे. मनाचे गूढ उलगडत नसल्याने मानसिक आजार रहस्यमय वाटतात यात नवल नाही.

मन म्हणजे अनुभव, निरनिराळ्या संवेदना, भावना,  विचार, आठवणी इत्यादींचा अनुभव म्हणजे मन. सामान्यपणे आपण आपल्या छातीवर डाव्या बाजूला हात ठेवून म्हणतो की, माझ्या मनात असं आलं किंवा माझ्या मनात असं अजिबात नव्हतं इत्यादी. याचा अर्थ आपलं मन आपल्या हृदयात असतं असं आपण मानतो, पण हे चुकीचे आहे. कारण आपल्याला येणारे अनुभव हे मेंदूमुळे येतात, म्हणजे मनाचे स्थान मेंदूत आहे. आपला मेंदू जवळजवळ एक हजार कोटी चेतापेशींचा बनलेला असतो. त्याचं अत्यंत गुंतागुंतीचे जाळे बनलेले असते. ज्ञानेंद्रियांमार्फत मिळालेली माहिती विद्युत रासायनिक स्पंदनांद्वारे मेंदूच्या निरनिराळ्या भागात पोचवली जाते. त्यावेळी विचार केला जातो आणि आपल्या वेगवेगळ्या भावना यामधून निर्माण होतात. मेंदूच्या रचनेत बिघाड म्हणजे अपघातात मेंदूच्या एखाद्या भागास इजा झाल्यास, त्या भागाने नियंत्रण केलेली क्रिया बंद पडते. उदाहरणार्थ स्मृती जाणे, वाचा बसणे, दृष्टी जाणे इत्यादी. मेंदूच्या कार्यात बिघाड झाल्यासही मनावर परिणाम होतो. उदाहरणार्थ दारू पिणाऱ्या माणसामध्ये दारूचा मेंदूतील विद्युत रासायनिक स्पंदनांवर परिणाम होतो, त्यामुळे दारुड्या माणसात असंबंद्ध बरळणे, शरीराचा तोल जाणे, स्मरणशक्ती कमी होणे, नैराश्य येणे, इत्यादी परिणाम दिसतात.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर
2 سال پیش در تاریخ 1401/08/29 منتشر شده است.
96,264 بـار بازدید شده
... بیشتر