बुवाबाजी विरोधाची वैचारिक भूमिका- डॉ. नरेंद्र दाभोलकर/ Dr Narendra Dabholkar Speech

21.4 هزار بار بازدید - 2 سال پیش - ऐसे कैसे झाले भोंदू। कर्म
ऐसे कैसे झाले भोंदू। कर्म करुनी म्हणती साधू।।
अंगा लावूनिया राख। डोळे झाकून करिती पाप।।
दावून वैराग्याच्या कळा। भोगी विषयाचा सोहळा।।
तुका म्हणे सांगू किती। जळो तयांची संगती।।

दीडशे वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी समाजात बुवा-बाबा, महाराजांची पैदास कशी होते, याचे मर्मग्राही विवेचन 'शेतकऱ्याचा असूड' या पुस्तकात केले आहे. ते लिहितात, "कित्येक अक्षरशत्रू भट-ब्राह्मणांस पंचांगावर पोट भरण्याची अक्कल नसल्यामुळे ते आपल्यापैकी एखाद्या बेवकूफ ठोंब्यास ढवळ्याबुवा बनवून त्याच्या पायात खडावा व गळ्यात वीणा घालून अज्ञानी शेतकऱ्यांकडे प्रतिष्ठित भीक मागत फिरतात. एखाद्या देखण्या जवानास कवळेबुवा बनवून टाळ-मृदुंगाच्या तालात मोठ्या प्रेमाने 'राधा कृष्ण राधा' म्हणत, नाच्या पोरासारखे हावभाव करून दर्शनास येणाऱ्या सधन रांडमुंडीस आपल्या नादी लावून, आपली पोटे भरून मोठ्या मौजा मारतात. एखाद्या अर्धवेड्या भांग्यास बागलकोटचे स्वामी बनवून, लोकांना त्याच्या नावाने नाना प्रकारच्या लोणकढ्या थापा देऊन स्वामींच्या दर्शनास त्यांना नेऊन द्रव्यहरण करतात." फरक झालाच असेल, तर एवढाच, की सर्वच जाती-धर्मांत आता असे उदंड पीक आले आहे.

तुकाराममहाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर,
प्रबोधनकर ठाकरे, गाडगेबाबा...

साऱ्या भारताने विस्मयाने आणि असूयेने पाहावे
अशी प्रबोधनाची एक ज्वलंत परंपरा
आपल्या महाराष्ट्राला लाभली.

त्याच आपल्या महाराष्ट्राला आज कर्करोगाप्रमाणे ग्रासून बुवांची प्रचंड भुतावळ आणि बुवाबाजीची दलदल सर्वत्र पसरली आहे.
समाजाचा नाश करायला निघालेल्या
असंख्य बुवांचे काळे कारनामे...
कथित दैवी चमत्कारांचे सत्यस्वरूप...
त्याच्या जाळ्यात सापडणाऱ्या जनमानसाचे
वैज्ञानिक विश्लेषण आणि
'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ने
जिवाच्या कराराने बुवाबाजीशी केलेला मुकाबला...

'ऐसे कैसे झाले भोंदू'- डॉ. नरेंद्र दाभोलकर
2 سال پیش در تاریخ 1401/09/13 منتشر شده است.
21,493 بـار بازدید شده
... بیشتر