Vishalgad protest: विशाळगडावरच्या अतिक्रमणावरून महाराष्ट्रात वाद का पेटला? संपुर्ण प्रकरण आणि इतिहास

BolBhidu
BolBhidu
770.9 هزار بار بازدید - ماه قبل - #BolBhidu
#BolBhidu #VishalgadAtikraman #VishalgadProtest

साल १६६०, तारीख १३ जुलै. विशाळगडावरुन झालेले तीन तोफांचे आवाज, महाराष्ट्राच्या इतिहासात कायमचे नोंदले गेले. ती खूण होती, छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचल्याची. सिद्दी जौहरचा वेढा, त्याच्या सैनिकांनी चालवलेला पाठलाग हे सगळं मोडून महाराज गडावर पोहोचले. इकडं पावनखिंडीत बाजीप्रभुंच्या, बांदल बंधूंच्या खांद्याला खांदा लावून मावळे लढत राहिले, त्यांनी हिंमत सोडली नाही, विशाळगडावरुन तोफांची इशारत ऐकू येईपर्यंत. या घटनेला आता ३६४ वर्ष पूर्ण होतील.

पण आत्ताही विशाळगड चर्चेत आहे, तो विशाळगडावर सुरु असलेल्या आंदोलनामुळं. विशाळगड मुक्त करा अशी घोषणा देत विविध हिंदुत्ववादी संघटना, संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. साधारण वर्षभरापूर्वीही विशाळगडावरचं अतिक्रमण हटवलं अशा बातम्या आल्या होत्या, पण विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा मुद्दा नेमका आहे काय ? सध्या आंदोलन कशामुळं सुरु आहे ? आणि या अतिक्रमणाचा इतिहास काय आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : Facebook: ​BolBhiduCOM
➡️ Twitter : Twitter: bolbhidu
➡️ Instagram : Instagram: bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
ماه قبل در تاریخ 1403/04/21 منتشر شده است.
770,955 بـار بازدید شده
... بیشتر