सामूहिक अत्याचाराचे आरोप, आरोपी Sanjay Roy चा इतिहास, Kolkata Doctor Case मधले धक्कादायक खुलासे...

BolBhidu
BolBhidu
1.4 میلیون بار بازدید - 4 هفته پیش - #BolBhidu
#BolBhidu #KolkataFemaleDoctorCase #RGKarHospitalCase गेले सहा दिवस कोलकाता महिला डॉक्टर हत्येच्या प्रकरणामुळं सगळा देश हादरलाय. कोलकाताच्या आर जी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ३१ वर्षीय महिला डॉक्टरची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. एका सरकारी हॉस्पिटलमध्ये इतका भयंकर गुन्हा घडल्यामुळं डॉक्टर्स, विद्यार्थी आणि विरोधी पक्षांनी ममता बॅनर्जी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडलं. पश्चिम बंगालसोबतच दिल्लीतल्या निवासी डॉक्टरांनीही आंदोलन करत बंद पुकारला. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी होत असतानाच मंगळवारी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेत. या प्रकरणी आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. आरोपी संजय हा पोलिसांचाच सीव्हिक वॉलिंटियर असून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तसंच पीडितेच्या हत्येनंतर तिच्या घरच्यांना हॉस्पिटल प्रशासनाकडून चुकीची माहिती देण्यात आल्याचंही तिच्या घरच्यांकडून सांगण्यात येतंय. आरजी करच्या प्राध्यापकांवरही गंभीर आरोप केले जात आहेत. तसंच हा सामूहिक अत्याचाराचा प्रकार असून, प्रशासन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोपही केले जातायंत. त्यामुळं कोलकाता महिला डॉक्टर हत्येचं प्रकरण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय. या प्रकरणात आतापर्यंत काय काय झालं, आरोपी संजय रॉयचा इतिहास काय, यामध्ये सामूहिक अत्याचाराचे आरोप का होतायंत, त्याचीच संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: bolbhidu.com/
4 هفته پیش در تاریخ 1403/05/24 منتشر شده است.
1,494,406 بـار بازدید شده
... بیشتر