अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभा, छत्रपती संभाजी नगर बैठक २३ जून २०२४

358 بار بازدید - 2 هفته پیش - छ.संभाजीनगर येथे 'महासभा ' संघटनेची
छ.संभाजीनगर येथे 'महासभा ' संघटनेची बैठक संपन्न.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
छ.संभाजीनगर : साईप्रसाद रिसॉर्ट धुळे रोड येथे दिनांक २३ जून रोजी ' अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभा ' संघटनेची बैठक संपन्न झाली. ' अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभेचे 'राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री साहेबराव महानुभाव सर, महासभा प्रसारक पंडित तळेगावकर, मराठवाडा विभाग प्रमुख प्रा.डॉ विजयकुमार बांदल सर, मराठवाडा निरिक्षक श्री विलास खामनेकर सर व नांदेड जिल्हा महासभा वधू वर सुचक मंडळाचे जिल्हाअध्यक्ष दिगांबरराव ढगे यांच्या उपस्थितीत छ.संभाजीनगर जिल्हा महानुभाव पुजारी भोपे महासभा नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदी प्रा. विजय साळकर सर , उपाध्यक्ष - श्री बाळासाहेब शिवणेकर जिल्हा सचिव पदी श्री दिपक कारंजकर, सह सचिव श्री महेंद्र वळसकर,जिल्हा संघटक श्री रमेशराव पंजाबी यांची नियुक्ती करण्यात आली.
     सदर बैठकीत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष, जिल्हाउपाध्यक्ष ,जिल्हा सचिव यांचेसह सर्वांनी आपले मनोगत वेक्त केले. महासभा पदाधिकारी प्रा.डॉ विजयकुमार बांदल सर, पंडित तळेगावकर सर ,विलास खामनेकर सर, दिगांबरराव ढगे यांनी महासभेचे विचार व्यक्त केले. राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री साहेबराव महानुभाव सर यांनी संघटनेची भूमिका व कार्य यावर सविस्तर विचार मांडले.
      संघटनेत कार्य करत असताना जिल्हाध्यक्ष यांची वैचारीक व सामाजिक प्रगल्भता कशी असावी ? प्रशासकीय अधिकारी  आणि संघटना पदाधिकारी यांच्यातील संवाद कसा असावा ? या  बाबींवर चर्चा करून समाजांच्या विविध महत्त्वपूर्ण प्रश्नासंदर्भात उपस्थितांशी सविस्तर चर्चा केली.
नवनियूक्त जिल्हा अध्यक्ष प्रा.विजय साळकर यांनी आपल्या मनोगतात पुजारी समाजाच्या अधोगतीस समाजातील काही विध्वंसक प्रवृत्तीस जबाबदार असल्याची खंत वेक्त केली. भविष्यात संभाजीनगर शहर व संबंध जिल्ह्यातील समाज बांधवांच्या समाज हितासाठीच काम करण्याचे आस्वासन दिले. त्याच बरोबर समाजाने पण सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
   आभार प्रदर्शन श्री दिपक कारंजकर यांने मानले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजहितार्थ निःस्वार्थ समाज सेवा करणारे तिरीप फाउंडेशन टिम अध्यक्ष मुरलीधर शेवलीकर सचिव कल्यान यादव तिरिप फाउंडेशन चे फाउंडर मेंबर श्री सुधाकर ढगे व श्री दीपक कारंजकर आदी समाज सेवक उपास्थित होते. कार्यक्रमाचा शेवटी  स्नेहभोजनाने सदर बैठकीची सांगता झाली.
🌻आपली समाज संस्था
🌻 अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभा
2 هفته پیش در تاریخ 1403/04/09 منتشر شده است.
358 بـار بازدید شده
... بیشتر