निरोगी राहण्याचे 33 नियम || Health Tips

Only Marathi
Only Marathi
1.6 میلیون بار بازدید - پارسال - निरोगी राहण्याचे 33 नियम ||
निरोगी राहण्याचे 33 नियम || Health Tips

निरोगी राहण्याचे 33 नियम

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे. पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये. डोळे कमजोर होतात.

(३) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकारचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात. आजही आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिश आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून देत.

(६) दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) गुटका, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, कोल्ड ड्रिंक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असावे.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिस, हॉर्ट अॅटक येऊ शकतो.
प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत स्नान करावे. नंतर डोक्यावर पाणी घ्यावे. त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होतो व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये. टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये. त्यामुळे रक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये. नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे 2 पाने खावीत. कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी. पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी. कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी ताजे पाणी प्यावे. विहीरीचे पाणी फार चांगले. बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये, यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग : यकृत, टायफॉइड, पोटाचे रोग. या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

(२२) स्वयंपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा. नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वयंपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, समोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

(२६) खाण्यास सैंधव मीठ सर्वश्रेष्ठ. त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तरी थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा मोहरीच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) साखर, साखरेपासून बनलेले पदार्थ, चहा, बेकरीत बनलेले पदार्थ या पदार्थांचं सेवन कमी करा. मीठ, मैदा या पदार्थांचे सेवन करू नका.

(३१) लिंबू, मोहरीचे तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात व दाताचे आजार सर्व बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.
پارسال در تاریخ 1402/02/26 منتشر شده است.
1,648,954 بـار بازدید شده
... بیشتر