५ किलो कैरीचं लोणचं । अचूक प्रमाणासह । एकदाच वर्षभरासाठी लोणचं करून ठेवा । Raw mango pickle of 5 kg

Anuradha Tambolkar
Anuradha Tambolkar
67.5 هزار بار بازدید - 2 سال پیش - कैरी लोणचं सर्वांना आवडतं. म्हणूनच
कैरी लोणचं सर्वांना आवडतं. म्हणूनच उन्हाळ्यात जेव्हा कैर्‍या उपलब्ध असतात, तेव्हा एकदाच वर्षभरासाठी लोणचं करून ठेवलेलं सोयीचं पडतं. त्यासाठीच ह्या व्हिडिओमध्ये, ५ किलो कैरीचं लोणचं कसं करायचं, ते अचूक प्रमाणासह दाखवलं आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. 🟠🟠🟠🟠🟠 ५ किलो कैरी' लोणच्यासाठी साहित्य:- - ५ किलो कैरीच्या फोडी - १ किलो मीठ - २५० ग्रॅम लाल तिखट - २५० ग्रॅम मेथीडाळ - ५०० ग्रॅम मोहरीडाळ - ५०० ग्रॅम कैरी लोणचं मसाला - २५ ग्रॅम हिरा हिंग ( खडे आणून कुटून मग मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यावी) फोडणीसाठी:- - २ लीटर तेल (शक्यतो रिफाईंड शेंगदाणा तेल वापरावं. त्याने चव चांगली येते.) - १५० ग्रॅम मोहरी - ५० ग्रॅम हिंग - १०० ग्रॅम हळद 🟠🟠🟠🟠🟠 १ किलो कैरी' लोणच्यासाठी साहित्य:- - १ किलो कैरीच्या फोडी - २०० ग्रॅम मीठ - ५० ग्रॅम लाल तिखट - ५० ग्रॅम मेथीडाळ - १०० ग्रॅम मोहरीडाळ - १०० ग्रॅम कैरी लोणचं मसाला - ५ ग्रॅम हिरा हिंग ( खडे आणून कुटून मग मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यावी) फोडणीसाठी:- - ४०० मिली तेल (शक्यतो रिफाईंड शेंगदाणा तेल वापरावं. त्याने चव चांगली येते.) - ३० ग्रॅम मोहरी - १० ग्रॅम हिंग - २० ग्रॅम हळद 🟠🟠🟠🟠🟠 काही लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे:- १) लोणच्याकरता कैरी निवडताना, कैरी हिरवी असावी, कडक असावी आणि आंबट असावी. २) कैरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यावी आणि कोरड्या कापडाने पुसून घ्यावी व नंतर सावलीत वाळवावी. वाळल्यानंतर हव्या त्या आकाराच्या फोडी कराव्यात. ३) बरणीतून लोणचं काढताना, चमचा नेहमी स्वच्छ व कोरडा असावा आणि बरणीचं झाकण घट्ट असावं. ४) लोणच्याची बरणी नेहमी सावलीत ठेवावी किंवा फ्रीज मध्ये ठेवावी. त्याच्यावर ऊन पडेल आशा जागी ठेऊ नये. ह्यामुळे लोणचं चांगलं टिकतं व फोडी पण कडक राहतात. ५) कैरीच्या लोणच्यासाठी शक्यतो शेंगदाण्याचे रिफाइंड तेल वापरावे, त्यामुळे छान चव येते. पण नसल्यास, तुमच्या आवडीच्या दुसर्‍या कुठल्याही रिफाइंड तेलाचा वापर केला तरी चालेल. #वर्षभरासाठी #कैरी #लोणचं #अचूक #प्रमाण #raw #mango #pickle #for_a_year #exact #proportion कैरी लोणचं कसं करावं, वर्षभरासाठी कैरी लोणचं, कैरी लोणचे रेसिपी मराठी, कैरीचे लोणचे, कैरी लोणचं, कैरी लोणचे, kairi lonche recipe in marathi, kairi loncha, kairi lonche, 1 kg kairi lonche, 5 k
2 سال پیش در تاریخ 1401/01/26 منتشر شده است.
67,531 بـار بازدید شده
... بیشتر