अभिनय। बालकविता 95।

Sayali chya Kavita
Sayali chya Kavita
12 بار بازدید - 2 ماه پیش - 95)अभिनय! आज आहे माझा अभिनय
95)अभिनय!
आज आहे माझा
अभिनय करण्याचा दिवस
शाळेमध्ये सादर करतोय
वाघोबाची खुन्नस
ठरल्या दिवशी मी
मस्त आवरून आलो
शेरसिंगाचा पुरा
चेहरा चढवून निघालो
मस्त कसा दिसतो
म्हणून आईने फोटो काढला
बाबांनी ही मला बघून
घाबरून श्वास सोडला
शाळेच्या बसमध्ये मी
बसलो मग ऐटीत
हत्ती आणि माकडाने
जागा दिली खिडकीत
सारे जण टक लावून
बघत होते सतत
मी मात्र ऐटीत बसून
वाघोबा होतो मिरवत
शाळेमध्ये मंचावर
नाव माझे घेतले
शेपूट नीट करून मी
टेचात संवाद फेकले
छान माझा अभिनय बघून
प्रेक्षक झाले थक्क
आई-बाबाही कौतुकाने
बघत होते चक्क!
इतक्यात अचानक एक
इवले झुरळ मंचावर आले
मिशा त्याच्या हलवून त्याने
नजरेने हास्य फेकले
त्याला असे बघताच
मी गेलो घाबरून
शेरसिंग कुठला? सोडा राव
अंग झालं घामाघुम
झुरळ ते जणू काही
वाघासारखे गरजलं
आणि माझं उरलं सुरलं
धाबंही दणाणलं!
झुरळाच्या भीतीने
ओरडलो मी जोरात
कार्यक्रम माझा सोडून
पळालो मी आत!
धन्यवाद!
कवयित्री- सायली वैद्य
मलबार हिल मुंबई
2 ماه پیش در تاریخ 1403/02/30 منتشر شده است.
12 بـار بازدید شده
... بیشتر