Devendra Fadnavis आणि Uddhav Thackeray यांची गुप्त भेट झाल्याचा दावा, Eknath shinde टार्गेटवर ? #bjp

BolBhidu
BolBhidu
22.5 هزار بار بازدید - 3 روز پیش - #BolBhidu
#BolBhidu #DevendraFadnavis #UddhavThackeray ५ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजता देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले होते. दोघांमध्ये तब्बल २ तास चर्चा झाली. या भेटी आधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती, असा खळबळजनक दावा वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केलाय. त्यांनी या भेटीगाठींचा सगळा घटनाक्रमही सांगितलाय. वंचितच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्याच्या राजकारणात खळबळ उडालीय. राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना ठाकरे गट युती होणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. वंचितच्या दाव्याचं ठाकरे गट आणि भाजपच्या प्रवक्त्यांकडून खंडन केलंय. अशी कोणतीही भेट किंवा चर्चा झाली नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. मात्र या बातमीचं टायमिंग पाहता, या सगळ्यामागं भाजपचं मोठं राजकारण असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीच भाजप वंचितच्या खांद्यावर बंदूक चालवतंय, असं बोललं जातंय. वंचितच्या खांद्यावरून भाजप बंदूक चालवतंय, अशा चर्चा का होतायत? अशी चर्चा घडवून आणण्यामागं भाजपचा नेमका डाव काय असू शकतो? यामुळे कुणाचं डॅमेज होईल, सगळ्याचं प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात, या व्हिडीओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: bolbhidu.com/
3 روز پیش در تاریخ 1403/07/10 منتشر شده است.
22,547 بـار بازدید شده
... بیشتر