दहा पारमिता | Daha Parmita | Ten States of Perfection | बुद्धांनी सांगितलेल्या दहा पारमिता | जोशाबा

JoShaBa
JoShaBa
9 هزار بار بازدید - 2 سال پیش - जोशाबाjoshabasumedhमित्रांनो, या video मध्ये आपण
जोशाबा
joshaba
sumedh

मित्रांनो, या video मध्ये आपण बघणार आहोत, भगवान बुद्धांनी आपल्या पहिल्या प्रवचनात सांगितलेल्या दहा पारमिता आणि त्यांचा अर्थ.

भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन शीलमार्ग (चालू)
नंतर तथागत बुद्धांनी परिव्राजकांना शीलमार्ग तथा सद्गुणांचा मार्ग समजावून सांगितला.
त्यांनी त्यांना सांगितले की शीलमार्ग म्हणजे पुढील गुणांचे पालन करणे होय:
(१)शील (२)दान (३)उपेक्षा

(४)नैष्कर्म्य (५)वीर्य (६)शान्ती

(७)सत्य (८)अधिष्ठान (९)करुणा

आणि (१०)मैत्री
या सद्गुणांचा अर्थ परिव्राजकांनी बुद्धांना विचारला.
त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी बुद्ध म्हणाले:-

"शील म्हणजे नीतिमत्त.
वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल; अपराध करण्याची, चुकीचे वागण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील."

"नैष्कर्म्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग."

"स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे इतकेच नव्हे तर स्वतःचे प्राण देणे म्हणजेच "दान" होय."

"वीर्य" म्हणजे योग्य (सम्यक्)प्रयत्न व परिश्रम. हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य."

"शांती म्हणजे क्षमाशीलता.द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष शमत नाही; तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो."

"सत्य" म्हणजे खरे.माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये."

"अधिष्ठान" म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय."

"करुणा" म्हणजे सर्व मानवांविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता."

"मैत्री" म्हणजे सर्व प्राण्यांविषयी; मित्रांविषयीच नव्हे तर शत्रूविषयी देखील; मनुष्यप्राण्याविषयीच नव्हे तर जीवमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे."

"उपेक्षा" म्हणजे औदासिन्याहून निराळी अशी अलिप्तता.अनासक्ती. आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. फलप्राप्तीने विचलित न होणे; परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा."

"आपल्या कुवतीनुसार  या सद्गुणांचे पालन केले पाहिजे. म्हणूनच त्यांना पारमिता (पूर्णत्वाच्या अवस्था) असे म्हणतात."


---------------------------------

Disclaimer
This video is for educational purpose only. Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use a use permitted by Copyright statue that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in fever of fair use. All credit for copyright material used in this video goes to respected owner.
------------------------------------------
2 سال پیش در تاریخ 1401/10/21 منتشر شده است.
9,035 بـار بازدید شده
... بیشتر