गौतम काकडेला आज कोर्टात कसं हजर केलं? काकडे बापलेकांचा कालचा रुबाब आज कसा होता?

Mahanews LIVE
Mahanews LIVE
429.6 هزار بار بازدید - 2 هفته پیش - #baramati
#baramati #bakasur #bakasurvsmathur #bakasursharyat #bailgada #bailgadasharyat #bailgada_sharyat_official #bailgadapremi #bailgadapremi #bailgadarace #bailgadaa5000 #mathur #ranjitnimbalkarsir #gautambhaiya #maharashtra #marathinews #crime_news #firingnews

निंबूत गोळीबार प्रकरण : रणजीत निंबाळकरांच्या नातेवाईक व चाहत्यांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या!  बैल ताब्यात द्या! गौतम काकडेंना अटक करा! गौतम काकडेंच्या घरावर जाण्याचा व्यक्त केला इरादा!
गुरुवारी मध्यरात्री 11 च्या सुमारास गोळीबार झाला आणि गोळीबारात जखमी झालेल्या फलटणच्या रणजीत निंबाळकरांची जगण्याची लढाई आज पहाटे अडीच वाजता संपली. त्यानंतर रणजीत निंबाळकरांचे चाहते, त्यांचे नातेवाईक व निकटवर्तीय यांनी आज सकाळी वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे गाठले. याच पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे, मात्र गौतम काकडेंना अजून अटक करण्यात आलेली नसल्याने गौतम काकडेला अटक करा, आमचा बैल आमच्या ताब्यात द्या, अन्यथा आम्ही गौतम काकडे च्या घरासमोरून हलणार नाही असा इरादा व्यक्त करत गर्दी वाढू लागल्याने तणाव निर्माण झाला.

गुरुवारी मध्यरात्री 11:00 वाजल्यानंतर ते आज पहाटेपर्यंत बारामती तालुक्यात मोठी खळबळजनक घटना घडली. बैल आणि बैलगाडा शर्यतीच्या दुनियेत महत्त्वाचं नाव असलेल्या ट्रिपल महाराष्ट्र हिंदकेसरी गौतम काकडे यांच्या घरी बैलाच्या व्यवहारावरून गोळीबार झाला, या गोळीबारात जखमी झालेल्या रणजीत निंबाळकर यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार दरम्यान त्यांचा पहाटे मृत्यू झाला.

बैलाच्या व्यवहारावरून वाद होऊन गोळीबार होण्याची व त्यात एखाद्याचा जीव जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याने राज्यभरातील बैलगाडा शर्यत प्रेमीना मोठा धक्का बसला आहे.
बैलगाडा शर्यत रक्तरंजित होण्याची तशीही पहिलीच गंभीर घटना आहे. त्यामुळे राज्यभरात या घटनेची चर्चा आहे. गोळीबाराची घटना घडल्यापासून बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये गौतम काकडे यांच्या बद्दल संतापाची लाट होती.
गौतम काकडे यांच्या व्यवहाराबद्दल अनेक जण बोलू लागले होते. आज पहाटे रणजीत निंबाळकर यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच या संतापाचा कडेलोट झाला. अनेक जण मिळेल त्या वाहनाने वडगाव निंबाळकर ला पोहोचत होते. त्यांनी वडगाव निंबाळकर ला येऊन आमचा सुंदर बैल आमच्या ताब्यात द्या व गौतम काकडे अटक करा अशी मागणी केली जर आमचा बैल आमच्या ताब्यात दिला नाही तर आम्ही गौतम काकडीच्या घरासमोरून हलणार नाही अशी देखील मागणी या संतप्त नातेवाईकांनी केली.
दरम्यान या घटनेत पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून गौरव काकडे यास अटक केली आहे, तर सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण गुन्ह्यांमध्ये सहा जणांचा समावेश झाला आहे.
गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास गौतम शहाजी काकडे याच्या घरी निंबूत येथे बैलाच्या पैशाच्या व्यवहारावरून गौतम काकडे याचा भाऊ गौरव याने फलटण येथील सुंदर बैलाचा मालक रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळी झाडली. गोळी डोक्यात गेल्याने निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना सुरुवातीला बारामती येथे व त्यानंतर पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या संदर्भात अंकिता रणजीत निंबाळकर (रा. स्वामी विवेकानंद नगर फलटण) यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे व तीन अनोळखी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आता या घटनेतील जखमी निंबाळकरांचे निधन झाल्याने हा गुन्हा आता खुनाचा गुन्हा म्हणून रूपांतरीत
2 هفته پیش در تاریخ 1403/04/11 منتشر شده است.
429,683 بـار بازدید شده
... بیشتر