Kamal Lochan | Bharatanatyam

ADITI TONPE
ADITI TONPE
1.1 هزار بار بازدید - 12 ماه پیش - पदम् (कमल लोचन)ताल - मिश्रचापूराग
पदम् (कमल लोचन)
ताल - मिश्रचापू
राग - यमनकल्याण

(कमल लोचन कटी पितांबर अधर मुरली गिरीधरन्)
कमळासारखे डोळे असलेला, पितांबर नेसलेला,
बासरी वाजवणारा, गोवर्धन पर्वत उचलणारा

(मुकूट कुंडल करल कुटिया सावरे राधे वरन्)
ज्याने मुकुट व कुंडल घातले आहेत
गायींचे रक्षण करणारा, हा देखणा राधेचा वर

(पूर जमुना धेनू आगे सकल गोपिक मन हरन्)
यमुनेच्या काठी गायीगुरांना चरायला नेणारा,
सर्व गोपिकाचे मन जिंकून घेणारा

(पीत वस्त्र गरुड वाहन चरण नीत सुखसागरान्)
पिवळ्या रंगाचे वस्त्र घातलेला, गरुड ज्याचे वाहन आहे,
अशा या श्रीकृष्णाच्या चरणांशी जणू सुखाचा सागर आहे

(बन्सीधर वसुदेव छैया बालीछयो हरी वामनम्)
बासरी वाजवणारा, वासुदेवचा पुत्र, वामन अवतारात बळी
राजाचा वध करणारा

(डुबते गजराज लीनो लंका छेद्यो रावणम्)
बुडणाऱ्या गजेंद्रला वाचवणारा श्रीकृष्ण,
तर राम अवतारात रावणाचा वध करणारा

(दीननाथ दयाळू सिंधू करुणामयी कारूणाकरन्)
दीन दुबळ्यांचा नाथ, दयेचा सागर, सर्वांवर करुणा करणारा

(रायदास दास विलाप निसदीन नाम जप नीत केशवं)
ह्या गीताचे गीतकार कवी रायदास हे श्रीकृष्णाचे सतत
चिंतन करतात , रोज नित्यनेमने त्याच्या नावाचा जप करतात
12 ماه پیش در تاریخ 1402/06/15 منتشر شده است.
1,183 بـار بازدید شده
... بیشتر