घरगुती तिखट लिंबु लोणचे | Limbu Lonche Recipe | homemade spicy Lemon Pickle Recipe | Nimboo Achar

Shidori
Shidori
327.1 هزار بار بازدید - 5 سال پیش - घरगुती तिखट लिंबू लोणचे/spicy lemon
घरगुती तिखट लिंबू लोणचे/spicy lemon pickle/Homemade pickle/एकदा  करून पहा  नेहमी  लोणचे असेच करालं!
#तिखटलिंबूलोणचे
#निंबुकाआचार
#तिखानिंबुआचार
चटपटीत लोणचे
निंबु का आचार
तिखा आचार
तिखट लिंबू लोणचे
#limbuloncherecipe

               तिखट लिंबू लोणचे
साहित्य:-
लिंबू एक डझन (12)
मोहरी डाळ पाऊण वाटी (75gm)
अर्धा वाटी तिखट पुड (55gm)
खडा मीठ पाऊण वाटी (85)gm
सैंधव मीठ 15gm
10 मीरे
10 लवंग
हळकुंड 10 gm
हिंगडी खडा/हिंग पुड 10gm
मेथी दाणे 1tsp
साखर  पाव वाटी
तेल अर्धा वाटी

कृती:-

 12 लिंबू कापुन  प्रत्येकी आठ फोडी करून घ्यावे
त्यातील 20 फोडी बाजुला ठेवून घ्यावे
मोहरी डाळ , मीठ भाजुन घ्यावे
मेथी दाणे एक चमचा तेल घालून भाजून घ्यावे
तेलात हिंग खडा व हळकुंड तुकडे करून तळून घ्यावे
सर्व ताटलीत थंड होऊ द्यावे
शिल्लक राहिलेले तेल गरम करून घेणे
थोडे थंड झाल्यावर मीरे व लवंग घालून घ्यावे
तेल पु्र्ण थंड होऊ द्यावे
भाजलेल्या मोहरी डाळीतील थोडी डाळ बाजुला ठेवून घ्यावे
थंड झालेले मोहरी डाळ+मीठ+मेथी दाणे+तळलेले हळकुंड+तळलेले हिंगडी मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यावी
एका बाऊल मध्ये लिंबू फोडींना सैंधव मीठ चोळावे
+ मिक्सरमधून बारीक केलेली पुड घालावे
+तिखट पुड घालुन घ्यावे
+ साखर घालून घेणे
बाजुला ठेवलेल्या लिंबाच्या फोडीतुन  रस काढून  घालून घ्यावे व फोडी त्यातचं घालून घ्यावे
चमच्यानी मिश्रण चोळुन घ्यावे म्हणजे  त्याला ओलंसरपणा येईल.
+ थंड करुन घेतलेले तेल घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे
बरणीत भरून ठेवावे
आठ दिवसांत लोणचे छान मुरते
मग त्याचा आस्वाद घ्यावा
करुन पहा व त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका


पाकातील गोड लिंबू लोणचे
गोड लिंबु लोणचे/मुलांच्या आवडीचे  साख...

उपवासाचे लिंबू लोणचे
लोणचे | उपवासाचे चटकदार लिंबु लोणचे |...


इन्स्टंट लिंबू लोणचे

लिंबू लोणचे/ अर्धा तासात वर्ष भर टिकण...


Thank you
5 سال پیش در تاریخ 1398/11/02 منتشر شده است.
327,157 بـار بازدید شده
... بیشتر