आई मुंब्रादेवी देवस्थानचा इतिहास (भाग-१) | History of Aai Mumbra Devi Temple, Mumbra (Episode-1)

ViGaMi
ViGaMi
37.2 هزار بار بازدید - 3 سال پیش - माझी आई मुंब्रादेवीआई मुंब्रादेवी देवस्थानचा
माझी आई मुंब्रादेवी

आई मुंब्रादेवी देवस्थानचा इतिहास (भाग-१)

#13

#मुंब्रादेवी #historyofindia #naturebeauty #forest #greenary #Waterfall #nearmumbai #beautifulplace #travel #silence #roadtrip #spiritualplace #मुंब्रादेवीदेवस्थान

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा हे शहर आपल्या निसर्ग सौंदर्यामुळे आणि भौगोलिक विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. शक्यतो कोणत्याही रेल्वे स्थानकावर गेल्यावर पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग असतात परंतु माझ्या बघण्यात हे एकमेव शहर असेल ज्याच्या पूर्वेस मुंब्य्राची खाडी व पश्चिमेस सह्याद्रीचा डोंगर आणि या डोंगराच्या कुशीत वसलेलं मुंब्रा शहर. या शहराची ग्राम देवता आई मुंब्रादेवी. डोंगरावर असणार्‍या देवीच्या या मंदिरामुळे या शहराला "मुंब्रा" नाव पडलं. मुंब्रा रेल्वे स्थानकातुन बाहेर पडल्यावर काही पावलांवरच मुंब्रा देवी देवस्थानाचे प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे.

मुंब्रा शहराचे शिल्पकार माजी सरपंच कैलासवासी नाना दादा भगत यांच्या परिवारातील सदस्यांचे निवासस्थान मंदिराच्या पायथ्याशी असून गेली अनेक वर्षे मुंब्रा आईची सेवा भगत परिवारातील सदस्यांच्या अनेक पिढ्यांकडून केली जात आहे.

मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण ७५०-८०० पायर्‍या सर करुन जावे लागते त्यामुळे पहिल्यांदाच जात असल्यास आपली शारीरिक क्षमता बघून थांबत थांबत चढल्यास धाप लागणार नाही. मुंब्रा बायपास झाल्याने मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता दोन भागात विभागला गेला त्यामुळे येथे भुयारी मार्ग करण्यात आला आहे. अनेक वर्षांपूर्वी मुंब्रा रेल्वे स्थानकाबाहेरुन जाणारा रस्ता जुना पुणे महामार्ग म्हणून प्रसिद्ध होता परंतु वाढणारी रहदारी आणि होणारे अपघात यामुळे वाहतुकीस पर्यायी व्यवस्था म्हणून डोंगर फोडून हा बायपास बांधण्यात आला. प्रवास जलद झाला पण निसर्गाची मोठी हानी झाली. येथूनच पुढे बघायला मिळतं ते निसर्गाचं खरं सौंदर्य. मुंब्र्याला पोहोचण्यासाठी आपण रस्ता मार्गे या बायपासने, जुना पुणे महामार्ग किंवा रेल्वेने मुंब्रा स्थानकावरुन येऊ शकता. येथे येण्यासाठी कोणतेही ऋतू उत्तम पण निसर्ग सौंदर्य अनुभवायचे असेल तर पावसाळा आणि हिवाळा उत्तमच.

साती आसरा मंदिर आज पूर्णतः बांधलेले आहे परंतु माझ्या बालपणी हे मंदिर नसुन झाडांखाली या पाषाणांची स्थापना करण्यात आली होती. या परिसरात पुस्तकं घेऊन आम्ही पाठांतरास यायचो एवढं सुंदर दृश्य आणि शांतता या परिसरात असायची.

आज मंदिरापर्यंत पिण्याचे पाणी पाईपाने पोहचले परंतु काही वर्षांपूर्वी या झर्‍याचे मिनरल वॉटर कॅनद्वारे भाविकांमार्फत मंदिरापर्यंत पोहचवले जायचे. भाविकांसाठी देवीची सेवा आणि शारीरिक कसरत देखील यामुळे व्हायची. या पाण्याला फिल्टरची गरजच नाही तर दगड-मातीचे क्षार आणि झाडांची मुळे या पाण्याचे शुद्धीकरण करतात. सभोवतालचा सुंदर निसर्ग अनुभवत आपण आई मुंब्रादेवी देवस्थानच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येऊन पोहचतो.

#विगमी #ViGaMi

✍️ विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची

----------------------------------------------
🎼 Music used with Thanks

Dhaka by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. https://creativecommons.org/licenses/...

Source: http://incompetech.com/music/royalty-...

Artist: http://incompetech.com/

----------------------------------------------

#marathivlog #marathivlogger #youtubeindia #youtuber #MumbraDevi #mumbra #mumbrahill #temple #templesinmaharashtra #maa #आई #मुंब्रा
3 سال پیش در تاریخ 1400/05/13 منتشر شده است.
37,273 بـار بازدید شده
... بیشتر