मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्यायची असेल तर अशा पद्धतीने तयार करा पाव भाजीचा मसाला

Gharcha Swaad
Gharcha Swaad
64 هزار بار بازدید - 5 سال پیش - How To Make Pav Bhaji
How To Make Pav Bhaji Masala | Homemade Pav Bhaji Masala | पाव भाजी मसाला | Recipe By Gharcha Swaad

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 mihaykoli

साहित्य - १ tsp शहाजीरे, १ tsp ओवा,  १ tsp साधे जीरे, १ tsp सुंठ पावडर,  १ tsp काळं मीठ, १५/२० काळीमीरी, १ चक्रीफूल, ५ लवंगा, १" दालचीनी, २ हिरव्या वेलच्या, १ मोठी मसाला वेलची, अर्धा तुकडा पीपली, ७ काश्मिरी सुक्या मिरच्या, ९/१० पटना सुक्या मिरच्या, ६ ब्याडगी सुक्या मिरच्या, १½ tsp बडीशेप, ३ tblsp धणे, ३/४ तेजपत्ता, ½ tblsp आमचूर पावडर आणि १ tsp हळद.

कृती - सर्वप्रथम मिरच्या मंद आचेवर कुरकुरीत करून घ्या. त्यानंतर तेजपत्ता आणि धने वेगळे खरपूस भाजून घ्या. आता शहाजीरे, ओवा, साधे जीरे हलके भाजून घ्या.  त्यानंतर काळीमीरी, चक्रीफूल, लवंगा, दालचीनी, हिरव्या वेलच्या, मोठी मसाला वेलची, अर्धा तुकडा पीपली, काळं मीठ हे एकत्र साधारण १ ते १½ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या. तयार भाजलेले सर्व साहित्य आणि आमचूर पावडर, हळद, सुंठ पावडर हे सर्व एकत्र करून घ्या आणि मिक्सर मध्ये बारीक वाटून पावडर तयार करून घ्या. तयार पावभाजीचा मसाला हवाबंद डब्ब्यात साठवून ५ महिने पावभाजीसाठी वापरू शकता. धन्यवाद !    

#pavbhajimasalarecipe #pavbhaji #homemadepavbhajimasala

If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Follow Us On Instagram  👉 Instagram: gharcha_swaad

Follow Us On Facebook 👉  Facebook: gharcha.swaad

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]
5 سال پیش در تاریخ 1397/11/10 منتشر شده است.
64,022 بـار بازدید شده
... بیشتر