छत्रपती संभाजीनगरचे पुढचे ९ आमदार हे असतील| Sambhaji Nagar Vidhan Sabha 2024 | Vishaych Bhari

Vishaych Bhari
Vishaych Bhari
27.4 هزار بار بازدید - ماه قبل - छत्रपती संभाजीनगरचे पुढचे ९ आमदार
छत्रपती संभाजीनगरचे पुढचे ९ आमदार हे असतील| Sambhaji Nagar Vidhan Sabha 2024 | Vishaych Bhari

छत्रपती संभाजीनगर हा राज्यातील महत्वाचा जिल्हा. निरनिराळी पर्यटनस्थळं, मराठवाड्याचं केंद्रबिंदू, राजकारण्यांसाठी हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाची हक्काची जागा,  एमआयडीसी, ऐतिहासिक वारसास्थळं या सर्व गोष्टींमुळे छत्रपती संभाजीनगर कायम चर्चेत असतं. जिल्ह्याच्या नामांतराच्या क्रेडिटवरून आजही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये भाडणे होतात. तसंच शिवसेना, एमआयएम, भाजप या प्रमुख पक्षांच्या हालचालींमुळे छत्रपती संभाजीनगर हे राजकियदृष्ट्या कायम चर्चेत असतं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण मराठवाड्यात महायुतीने केवळ छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा जिंकण्यात यश मिळवलं. संदीपान भुमरे या एकनाथ शिंदेंच्या विश्वासू शिलेदाराने ४ वेळचे खासदार चंद्रकांत खैरे आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचा पराभव करत महायुतीचा झेंडा रोवला. बऱ्याच वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये खान हवा की बाण हवा असं म्हणत हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवर निवडणूक लढवली जायची. यंदाच्या निवडणूकीला मात्र मराठा विरुद्ध ओबीसी वादाची किनार असल्याचं पहायला मिळालं. शिवसेना शिंदे गटाने मुस्लिम आणि इतर जातीय उमेदवाराच्या विरोधात मराठा उमेदवार देऊन इथलं विजयाचं गणित सोपं केलं. एकनाथ शिंदे यांनी हट्टाने मागून घेतलेली जागा जिंकून दाखवत येत्या विधानसभा निवडणूकीसाठी स्वतःची बार्गेनिंग पावर वाढवुन ठेवली. याच जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ मात्र जालना लोकसभेत येतात. जालन्यात यंदा काँग्रेसचे कल्याण काळे निवडून आल्यानं महाविकास आघाडीला काहीसं पूरक वातावरण आहे असं म्हणता येईल. शिवसेना शिंदे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार का? काळेंच्या विजयाची मदत महाविकास आघाडीला होणार का? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ विधानसभा जागांवर नेमकं काय होणार याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

Facebook: %E0%A4%B5%E0..

instagram link :

Instagram: vishayachbh..

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#sambhajinagarvidhansabha2024
#sambhajinagar bus
#sambhajinagar news
#sambhajinagarnews todaylive
#sambhajinagarnewszee 24taas
#sambhajinagarcar accident
#sambhajinagarloksabha2024
#sambhajinagarlive
#sambhajinagarloksabha
#sambhajinagarivenews
#sambhajnagarlive today
#sambhajinagaraurangabad
#sambhajinagarexitpoll
#sambhajinagarelectionnews2024
ماه قبل در تاریخ 1403/04/17 منتشر شده است.
27,480 بـار بازدید شده
... بیشتر