रायरेश्वर किल्ला | Raireshwar Fort | रायरेश्वर पठार | Raireshwar temple | Raireshwar pathar

227 بار بازدید - 7 ماه پیش - रायरेश्वर किल्ला ता.भोर जि.पुणे**************************रायरेश्वराचे पठार
रायरेश्वर किल्ला ता.भोर जि.पुणे
**************************

रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो.
रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.



शिडीच्या वाटेने गडाच्या माथ्यावर पोहोचताच,समोरच आपल्याला रायरेश्वराचे अवाढव्य आकाराचे पठार नजरेस पडते. पठाराचा विस्तार 16 किमी इतका प्रचंड पसरला असून या पठारावर पांडवकालीन रायरेश्वराचे मंदिर पाहायला मिळते. या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची१३३७ मिटर इतकी आहे.गडावर पवित्र रायरेश्वर मंदिर, पांडव लेणी, गोमुख तळे व जिवंत झरा असून वर्षाचे १२ महिने या ठिकाणी शुध्द पाणी असते.



या गडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणी सात ते आठ विविध रंगाची माती पाहायला मिळते त्यामध्ये निळी, हिरवी, लाल, तांबडी, पिवळी, काळी, जांभळी आणि निळसर रंगाची माती आढळते. रायरीच्या पठाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात याठिकाणी वाहणारा रिव्हर्स वाटरफाॅल, पावसा ची पाणी पठारावरून खाली न पडता हवेच्या दाबामुळे ते उलट्या दिशेने वाहते. याच बरोबर रिव्हर्स व्हाॅइस पाँइट, सनसेट पाँइट, शिवकालीन तळे अशी अनेक पाहण्यासारखे पाँइट आहेत.



छत्रपती शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे २७ एप्रिल १६४५ रोजी याच रायरेश्वर पठारावरील रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे रक्षण केले, रयतेस परकी आक्रमकांपासून गुलामगिरीपासून मुक्तता मिळवून दिली. मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले. याठिकाणी दिलेली स्वराज्याची संकल्पना संकल्पना पुढे अटक पासून कटक पर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार होण्यापर्यंत झाली.
      रायरेश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवरायां बरोबर कान्होजी जेधे बाजी पासलकर तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे येसाजी कंक सूर्याजी काकडे बापूजी मुदगल नरसप्रभू गुप्ते सोनोपंत डबीर हे बारा मावळातील सवंगडी शपथ वेळी उपस्थित होते. या शपथे नंतर मूठभर मावळ्यांनी दिल्ली व विजापूर या राजसत्तांना पाणी पाजले त्याच बरोबर सिद्धी इंग्रज पोर्तुगीज त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडून त्यांचा बंदोबस्त केला. याच मुळे मराठा साम्राज्य रायरेश्वर चा किल्ला व त्यावरील रायरेश्वर मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे.


मंदिराच्या बाजूला उंच टेकडी असून या टेकडीवरून भवताल चा संपूर्ण परिसर अतिशय मनमोहक दिसतो आकाश स्वच्छ निरभ्र असेल तर या टेकडीवरून प्रतापगड केंजळगड कमळगड विचित्रगड मकरंदगड तसेच तुंग व तिकोना किल्ले सहज दिसतात.
___________________________________________
           
आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा.
माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा.

Please Like Share and Subscribe Channel

#भटकंतीसह्याद्रीसमूह
‪@Bhatkanti_Sahyadri_Samuh‬
#Bhatkanti_Sahyadri_Samuh


                            !!धन्यवाद!!
__________________________________________


महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे "भ्रमण महाराष्ट्राचे" हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.

                   


@bhraman_maharashtrache

#भ्रमण_महाराष्ट्राचे ‪@Bhraman_Maharashtrache‬    
___________________________________________
Shoot by:-
DJI OSMO Action
--------------------------------------------------------------------

आमच्या फेसबुक समूहात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://www.facebook.com/groups/82937...

इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Instagram: bhatkantisahyadrisamuh

Instagram: nskharate

__________________________________________

Please Like Share and Subscribe Channel
           
                       Thank You 🙏
-------------------------------------------------------------------
#raireshwar   #valleyofthewolves #रायरेश्वर #shivajimaharaj  #maharashtratourism #स्वराज्य  #sahyadri #fort #किल्ला  #gadkille
*******************************************
7 ماه پیش در تاریخ 1402/10/02 منتشر شده است.
227 بـار بازدید شده
... بیشتر