#CMEGP| मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम | Chief Minister Employment Generation Scheme\व्यवसाय

ABC मराठी
ABC मराठी
184 هزار بار بازدید - پارسال - स्वतःचा व्यवसाय सुरु करून उद्योजक
स्वतःचा व्यवसाय सुरु करून उद्योजक होण्याची सुवर्ण संधी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम Chief Minister Employment Generation Scheme राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरु केली आहे. • पात्र उद्योग – उत्पादन, सेवा, कृषि पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई-वाहतूक, ब्रॅन्ड आधारित विक्री केंद्र, फिरते विक्री केंद्र, खाद्यान्न केंद्र इ. • पात्र मालकी घटक – वैयक्तिक मालकी, भागीदारी, बचत गट • शैक्षणिक पात्रता – 1) रु. 10 लाखावरील प्रकल्पासाठी 7 वी उत्तीर्ण. 2) रु. 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 वी उत्तीर्ण. • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. कुटुंबाची व्याख्या ही पती, पत्नी अशी असेल. • अर्जदार व्यक्तीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) किंवा तत्सम केंद्र अिवा राज्य शासनाच्या अन्य विभाग / मंडळाकडील अनुदानांवर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेले नसावा. प्रकल्प किंमत – सेवा उद्योग कमाल मर्यादा १० लाख, उत्पादन उद्योग कमाल मर्यादा ५० लाख या योजनेबाबत खूप जणांना पूर्ण माहिती नसल्याने गोंधळ निर्माण होत आहे. मे २०२० अखेर या योजनेत दाखल झालेल्या ३९०२२ अर्जांपैकी बँकेकडून अद्याप फक्त ३१३५ मंजूर करण्यात आले. या व्हिडीओ मध्ये या विषय सारं माहिती देण्यात आली असून त्यासोबतच बँके कडून कर्ज मंजूर करून घेतांना आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती देण्यात आली आहे. व्हिडीओ पूर्ण पहा.
پارسال در تاریخ 1402/04/14 منتشر شده است.
184,098 بـار بازدید شده
... بیشتر