रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी पौष्टिक आणि चटपटीत आवळा कँडी- आवळा गोळी #immunitybooster #आँवला_गटागट

पाककला (Beauty&Art)
पाककला (Beauty&Art)
5.6 هزار بار بازدید - 2 سال پیش - आवळा (अमृता आमलकी ):-प्राचीन आयुर्वेदानुसार
आवळा (अमृता आमलकी ):-
प्राचीन आयुर्वेदानुसार आवळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन ग्रंथकारांनीं याला शिवा (कल्याणकारी), वयस्था (वाढत्या वयाला थांबवून ठेवणारे) तथा धात्री (आईसारखे रक्षण करणारे) म्हटले आहे.
आधुनिक शास्त्रही व्हिटॅमिन "सी'चा सर्वोत्तम स्रोत म्हणून आवळ्याकडे पाहते. आवळ्याची विशेषतः ही की आवळा शिजवला तरीसुद्धा त्यातील "सी' व्हिटॅमिन नष्ट होत नाही. आयुर्वेदाने आवळ्याचे गुणधर्म याप्रमाणे सांगितले आहेत, आवळा तुरट, आंबट व गोड असतो; शीतल तसेच पचायला हलका असतो; दाह तसेच पित्तदोष कमी करतो; उलटी, प्रमेह, सूज वगैरे रोगांमध्ये उपयुक्‍त असतो; रसायन म्हणजे रसरक्‍तादी धातूंना संपन्न करणारा असतो तसेच थकवा, मलावष्टंभ, पोटात वायू धरणे वगैरे त्रासांमध्ये हितकर असतोच. या सर्व गुणांमुळे आवळ्याला अमृताची उपमा दिलेली आढळते.

याशिवाय आवळा त्वचेसाठी उत्तम असतो, कांती सुधरवतो, केसांसाठी चांगला असतो, डोळ्यांसाठी उपयोगी असतो.

तर अश्या ह्या आवळ्याची एक अतिशय सोपी आणि चटपटीत व पौष्टिक रेसिपी म्हणजे आवळ्याची गोळी..

कमी साहित्यात व झटपट होणारी आवळ्याची गोळी :-

साहित्य :-
1) आवळे :-  8-10  (साधारण 1 वाटी गर  तयार होतो )
2) गूळ :- 1 वाटी ( किंवा आवळ्याच्या पेस्ट च्या समप्रमाणात )
3) जिरेपूड :- 1 चमचा
4) मीठ :- 1 चमचा ( किंवा सैंधव )
5) वेलची पूड :- पाव चमचा

कृती :-
1) प्रथम आवळे स्वच्छ धुवून घ्यावे
2) आवळे पाणी न घालता स्टीमर मधुन / कुकर मधुन वाफवून घ्यावे.
3) थोडे थंड झाल्यावर त्यातील बिया काढून घ्यावा व छोटे छोटे तुकडे करून मिक्सर मधुन पेस्ट करून घ्यावी.
4) पॅन मध्ये पाव चमचा तूप घालून त्यावर आवळ्याची पेस्ट घालून 2 mins परतून घ्यावी.
5) नंतर त्यामध्ये आवळ्याच्या पेस्ट च्या समप्रमाणात गूळ घालून mix करावा.
6) हे मिश्रण 7-8 mins चांगलं परतत रहावे. मिश्रण थोडं घट्ट झाल्यावर त्यात  जिरं, मीठ व वेलचीपूड घालून mix करून घ्यावी.
7) 2-3 mins नंतर मिश्रण पॅन सोडू लागेल.
8) मिश्रण पॅन ला चिकटणं बंद झालं की गॅस बंद करावा.
9) व हे मिश्रण एका प्लेट मध्ये काढून घेऊन, पसरवून थंड करावयास ठेवावे.
10)  एका प्लेट मध्ये पिठीसाखर पसरवून घ्यावी व मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर त्याच्या हव्या तश्या लहान मोठ्या आकाराच्या गोळ्या बनवून घ्याव्या.

11) सर्व गोळ्या बनवून झाल्यानंतर पिठीसाखरेत घोळवून घ्याव्यात व थोडा वेळ तश्याच सुकण्यासाठी ठेवाव्यात...

12) नंतर ह्या गोळ्या हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.
13) ही medium आकाराची रोज एक गोळी घेतली तरी रोगप्रतिकारक शक्ती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात रहाते.

🌸🌸🌸

🌹Explore more recipes here :-

🌸 सातपदरी करंजी :-
#सातपदरी करंजी #Layered Gujiya..#diwa...

🌸 रंगीत सातपदरी करंजी :-
#सातपदरी /साट्याची /पुडाची रंगीत करंज...


🌸 मालवणी खाजा :-
मालवणी खाजा  अगदी झटपट आणि एकदम सोप्य...

🌸 गुळपापडी :-
🌹अतिशय पौष्टिक व खुसखुशीत गुळपापडी /स...

🌸 आवळा गोळी /आवळा कँडी:-
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी पौष्टिक आ...

🌸 हरभरा हुरडा (street food ):-
🌹गाडीवर मिळतो तसाच हरभरा हुरडा घरच्या...


🌸 गुलाबजामुन चमचम :-
Party गुलाबजामून 🌸गुलाबजामून चा वेगळा...

🌸 तिरंगी बर्फी (गाजर बीट खोबरं ) :-
गाजर बीट खोबऱ्याची पौष्टिक बर्फी / वड...

🌸 भाजणीचे पौष्टिक मुटके (Multigrain dumplings ):-
🌹भाजणीचे पौष्टिक मुटके-चहासोबत व grav...
2 سال پیش در تاریخ 1401/09/13 منتشر شده است.
5,643 بـار بازدید شده
... بیشتر