Pooja Khedkar Case: Manorama Khedkar आणि Dilip Khedkar यांच्यावर गुन्हा, कुटुंबाच्या अडचणी वाढणार ?

BolBhidu
BolBhidu
215.2 هزار بار بازدید - ماه قبل - #BolBhidu
#BolBhidu #PoojaKhedkarCase #DilipKhedkar

राज्यात सध्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण चांगलंच गाजतंय. खासगी ऑडी कारवर लावलेल्या अंबर दिव्यामुळे त्या चर्चेत आल्या, पण त्यानंतर त्यांचे वेगवेगळे किस्से समोर यायला लागले. खासगी वाहनावर महाराष्ट्र शासन लिहिणं, वरिष्ठ अधिकाऱ्याचं चेंबर बळकावणं, कोट्यवधींची संपत्ती असताना नॉन क्रिमीलिअरचं प्रमाणपत्र सादर करत आरक्षणाचा लाभ घेणं आणि अंशत: दृष्टीदोष असल्याचा अपंगत्वाचा दाखला देणं, असे विविध आरोप त्यांच्यावर होतायत. पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये त्या हातात बंदूक घेऊन एका शेतकऱ्याला धमकावताना दिसतायत.

पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे सनदी अधिकारी होते. त्यांनी सरकारी सेवेत असताना कोट्यवधींची प्रॉपर्टी जमवल्याचा आरोप होतोय. त्यांच्याकडे ४० कोटींची संपत्ती आणि ११० एकर शेतजमीन असल्याचं समोर आलंय. पूजा खेडकर यांचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातला श्रीमंतीचा थाट आणि रुबाबापासून सुरू झालेले हे प्रकरण आता संपूर्ण खेडकर कुटुंबाला गोत्यात आणणारं ठरतंय. त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आणि जमीन बळकावल्याचे विविध आरोप होतायत. गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्या येतायत. या सगळ्या प्रकरणात खेडकर कुटुंब कसं अडकलंय? त्यांच्यावर काय आरोप होतायत? पाहुयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : Facebook: ​BolBhiduCOM
➡️ Twitter : Twitter: bolbhidu
➡️ Instagram : Instagram: bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
ماه قبل در تاریخ 1403/04/24 منتشر شده است.
215,276 بـار بازدید شده
... بیشتر