सर्व इच्छापूर्ण करणारा श्री गुरुचरित्र अध्याय १४ जिथे घडला ते ठिकाण एकदा नक्की बघा 😍| Marathi Vlog

Vishwanath Kulkarni
Vishwanath Kulkarni
529.9 هزار بار بازدید - 9 ماه پیش - सर्व इच्छापूर्ण करणारा श्री गुरुचरित्र
सर्व इच्छापूर्ण करणारा श्री गुरुचरित्र अध्याय १४ जिथे घडला ते ठिकाण एकदा नक्की बघा 😍| Marathi Vlog
#shrigurucharitra #shrigurdevdatta #vishwanathkulkarni #marathivlog

In this vlog second incarnation of Lord Dattatreya , Sree Nrusimha sarasawathy Swamy visited Basara Kshetra after he left Triambakeshwar. According to chapter 13 and 14 of Sree Guru Charitra. Sree swamy blessed a Brahmin by relieving him from a severe colic (stomach ache) in basara kshetra.

बासर येथील श्री एकमुखी दत्त मंदिराची वैशिष्ट्ये:

हे मंदिर श्री नरसिंहसरस्वती स्वामींचे अनुष्ठान ठिकाण होते. या पवित्र ठिकाणाच्या दोन आख्यायिका आहेत.

गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक १३ व १४ मध्ये उल्लेख केलेले ब्राह्मण श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकर या मंदिरात रोज पूजा अर्चना करत, ज्यांना पोटशूळाची व्यथा होती. पोटशुळाच्या व्यथेला त्रस्त होऊन ते एक दिवस गोदावरी नदीत जलसमाधी घेण्यासाठी जात असताना नरसिंहसरस्वती महाराजानी पाहिले व त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्यांना बोलावून घेतले. श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकरांचे दुःख समजून घेऊन त्यांनी श्री सायंदेवाना सांगितले की ह्यांना आपल्या घरी नेऊन पोटभर जेऊ घाला मग ह्यांची पोटशूळाची व्यथा जाईल.

श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकरांची पोटशूळाची व्यथा पोटभर जेऊ घालून दूर केली आणि श्री सायंदेवांचे प्राणांतिक संकट दूर केले. श्री सायंदेव हे एका यवनाधिपती कडे नौकरी करीत असत आणि एकेदिवशी श्री सायंदेवांना त्या यवनाधिपतीने देहदंड देण्यासाठी, वध करण्यासाठी बोलावले. त्यावेळी श्री सायंदेवांची आणि श्री नरसिंहसरस्वती स्वामींची भेट झाली. श्री सायंदेवानी त्यांची अडचण श्री नरसिंहसरस्वती स्वामींना सांगितली, श्री नरसिंहसरस्वती स्वामींनी श्री सायंदेवांना अभय वाचन दिले व सांगितले की आपण निर्धास्त पणे यवनाधिपतीची भेट घ्या. आपल्या जीवास धोका होणार नाही. जोपर्यन्त आपण यवनाधिपतीची भेट घेऊन परत येत नाही तोवर आम्ही येथेच आहोत. श्री नरसिंहसरस्वती स्वामींनी आज्ञा केल्या प्रमाणे श्री सायंदेव यवनाधिपतीची भेट घ्यायला गेले. जसे श्री सायंदेव यवनाधिपती च्या समोर गेले तसे त्या यवनाधिपतीला मरणांतिक हृदयशूळ चालू झाला. त्याला कळून चुकले की आपण चुकीचे काम करत आहोत, आणि मग त्याने श्री सायंदेवांची पायावर लोटांगण घेऊन माफी मागितली, त्यांना उत्तमोत्तम उपहार देऊन त्यांचा सत्कार करून त्यांची रवानगी केली. यवनाधिपती कडून निघून श्री सायंदेव, श्री नरसिंहसरस्वती स्वामींच्या दर्शनास गेले आणि सर्व वृत्तांत सांगितला.

बासर ला कसे जायचे :-
हे मंदिर जवळच्या हैदराबाद शहरापासून सुमारे 210 किलोमीटर (रस्त्याने) स्थित आहे. हे TSRTC द्वारे चालवल्या जाणार्‍या जिल्हा बसेसद्वारे चांगले जोडलेले आहे. MSRTC बसेस हैदराबाद, नांदेड इ. येथूनही धावतात. बासर येथे आपण मुंबई- मनमाड-छत्रपती संभाजी नगर-जालना- परभणी नांदेड मार्गे धावणाऱ्या चेन्नई expess,देवगिरी express ह्यांनी सुद्धाजाऊ शकतो ज्याकी आपल्याला बसरा अर्थात ( बासर) station ला उतरवतात . मंदिराच्या जवळचे रेल्वे स्टेशन बसरा रेल्वे स्टेशन आहे, जे सुमारे 2.4 किमी अंतरावर आहे.


पत्ता: श्री दत्तधाम बासर, पापहरेश्वर मंदिराजवळ,श्री क्षेत्र बासर जिल्हा-निर्मल

संपर्क आनंदराव पाटील ट्रस्टचे अध्यक्ष
P.N.9440152259.
मनोज तळणीकर ट्रस्टचे कोषाध्यक्ष नंबर 9422996290. यांच्याशी आपण फोनवर संपर्क करू शकता माहिती मिळेल.💐🙏
9 ماه پیش در تاریخ 1402/09/15 منتشر شده است.
529,999 بـار بازدید شده
... بیشتر