IBPS (PO & Clerical) प्रशिक्षण उपक्रम २०२४ | Sarthi Pune

SARTHI PUNE
SARTHI PUNE
1.1 هزار بار بازدید - 7 ماه پیش - देशभरातील विविध बँकांमधील रिक्त पदांच्या
देशभरातील विविध बँकांमधील रिक्त पदांच्या भरतीसाठी दरवर्षी IBPS ही संस्था परीक्षा घेते. या परीक्षेच्या माध्यमातून PO (Probationary Officer) आणि इतर Clerical पदांसाठी पात्र होता येते. त्यामुळे या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता, सारथी पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गातील लक्षित गटातील उमेदवारांना IBPS (PO & Clerical) प्रशिक्षण उपक्रम २०२४ अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येईल.


प्रशिक्षणाचे स्वरूप: नियमित ऑफलाईन प्रशिक्षण (Regular Offline Coaching)


सारथी संस्थेच्या मार्फत प्रायोजित IBPS (PO & Clerical) प्रशिक्षण उपक्रम २०२४ च्या अटी व शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, कागदपत्रे, मिळणारे लाभ व निवड पद्धत तसेच सुधारित वेळापत्रकाच्या माहितीकरिता सारथी संस्थेच्या www.sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी २५ जून २०१८ रोजी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथी संस्था कंपनी कायद्यानुसार स्थापन झाली. ११ फेब्रुवारी २०१८ पासून संस्थेने प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात केली. संस्थेबाबतची विविध माहिती आपण आमच्या चॅनेलद्वारे पाहू शकता.  
संकेतस्थळ -  https://sarthi-maharashtragov.in/
युट्युब चॅनेल - @sarthipune1789  
सारथी ॲप - https://play.google.com/store/apps/de...

#सारथी #Sarthi #GovrnmentScheme #Maharashtra #GovernmentPolicy #SkillDevelopment #IBPS #Banking #BankOfficer #PO #BankingExam
7 ماه پیش در تاریخ 1402/10/22 منتشر شده است.
1,157 بـار بازدید شده
... بیشتر