गणेशचतुर्थी विशेष नैवेद्याचे ताट-1 | दिवसभर मऊ राहणारे उकडीचे मोदक,अळूचं फतफतं ओला पावटा मिक्स भाजी

Krushnai Gazane
Krushnai Gazane
55.6 هزار بار بازدید - 2 هفته پیش - नमस्कार, आज मी तुम्हाला गणेशचतुर्थी
नमस्कार, आज मी तुम्हाला गणेशचतुर्थी विशेष नैवेद्याचे ताट बनवून दाखवणार आहे. गणपती आगमन दिवशी गणपती बाप्पासाठी स्पेशल असा नैवेद्य आज मी आणि आई तुम्हाला बनवून दाखवणार आहोत. आजचे सर्व पदार्थ अगदी पारंपारिक आहेत. अगदी मऊ लुसलुशीत दिवसभर मऊ राहणारे उकडीचे मोदक सोबत अळूचं फतंफतं, आणि ओले पावटे आणि डांबा(शेवग्याच्या शेंगा) बटाटा टाकून मिक्स भाजी अशी आजची साधी सोप्पी सहज बनवून तयार होणारी थाळी आहे. आई आणि मी तुम्हाला अगदी झटपट बनवून दाखवतो. साहित्य: ओले पावटे, शेवग्याच्या शेंगा, बटाटा मिक्स भाजी ओले पावटे अर्धा किलो डांबे 4 बटाटा 1 4 कांदे, 1 टोमॅटो, अर्धा कप ओल खोबरं, पाव कप कप कोथिंबीर, 6 पाकळ्या लसूण आणि 2 छोटे तुकडे आलं चेचून घेणे. 2 चमचे लाल मसाला, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद चविपुरता मीठ, तेल, पाणी अळूच फतंफतं साहित्य: 25 ते 30 अळूची पाने शेंगदाणे पाव किलो वाटणासाठी साहित्य:ओल खोबरं अर्धा कप, मिरची 2, आलं, लसूण 12/15 पाकळ्या, कोथिंबीर पाव कप 3 चमचे लाल मसाला,1 चमचा हळद, 2 चमचे गरम मसाला कोकम 2,मीठ, तेल, पाणी मोदक साहित्य: 1 वाटी तांदुळाचे पीठ 2 वाट्या पाणी मीठ पाव चमचा तूप मोदकाच्या सरणाचे साहित्य 1 वाटी ओल खोबरं पाऊण वाटी गूळ अर्धा चमचा वेलची पूड अर्धा चमचा जायफळ पूड 2 चमचे तूप
2 هفته پیش در تاریخ 1403/06/09 منتشر شده است.
55,674 بـار بازدید شده
... بیشتر