रंगपंढरी Face-to-Face: Suhas Joshi - Part 1

रंगपंढरी / Rang Pandhari
रंगपंढरी / Rang Pandhari
82.6 هزار بار بازدید - 5 سال پیش - आपल्या  सहजसुंदर अभिनयामुळे जगभरातील मराठी
आपल्या  सहजसुंदर अभिनयामुळे जगभरातील मराठी रसिकांच्या लाडक्या असलेल्या सुहास जोशी गेली पंचेचाळीसहून अधिक वर्षं मराठी रंगभूमीवर आणि चित्रपटांमध्ये कार्यरत आहेत.  

आत्मकथा, बॅरिस्टर, कन्यादान, सख्खे शेजारी, अग्निपंख, डॉक्टर तुम्हीसुद्धा, स्मृतीचित्रे अशा मैलाचे दगड मानल्या जाणाऱ्या अनेक मराठी नाटकात सुहास ताईंनी एकाहून एक वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका सादर केल्या आहेत.

सत्तरच्या दशकातील व्यावसायिक नाटकातील काहीशी भडक अभिनयशैली आणि दिग्दर्शक सांगेल ते सगळं फारसा विचार न करता पार पाडणे इत्यादी प्रथा हळूहळू बदलण्यात सुहास ताईंचा हातभार मोठा आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मधून मिळवलेलं शिक्षण, नट म्हणून स्वतंत्र विचार आणि कसून मेहनत करायची सवय, आणि वास्तववादी अभिनयशैली ह्याच्या बळावर सुहास ताईंनी एक नवा पायंडा पाडला. आणि  'Thoughtful, versatile, natural acting' म्हणजे काय ह्याचा परिपाठ रंगकर्मींना घालून दिला.    

ऐकूया ह्या सगळ्याबद्दल आणि सुहास ताईंच्या अभिनय प्रक्रियेबद्दल.
5 سال پیش در تاریخ 1398/09/29 منتشر شده است.
82,673 بـار بازدید شده
... بیشتر