Shree Jogeshwari Devi | जोगेश्वरी देवी | Sillod Aurangabad | Marathi Vlog |

Gopal Daud Vlogs
Gopal Daud Vlogs
10.1 هزار بار بازدید - 4 سال پیش - Jogeshwari Devi | जोगेश्वरी देवी
Jogeshwari Devi | जोगेश्वरी देवी | Ghatnandra Sillod | Aurangabad | Marathi Vlog





या लेणीचे काम इ.स.712 मध्ये राष्ट्रकूट तिसरा गोविंद राजा यांचा पुत्र अमोघवर्ष राष्ट्रकूटांच्या कालावधीत करण्यात आल्याचे सांगण्यात येते.याच राष्ट्रकूट राज्याने वेरूळच्या लेण्यांमध्ये कैलास मंदिर उभारले आहे असे म्हटले जाते. या जोगेश्वरी देवीच्या   मंदिरात राष्ट्रकूट कालीन शिलालेख असून तो पाली भाषेत असावा असा अंदाज आहे.

या कोरीव लेण्याचे दोन ताल असून खालच्या भागात पूर्ण पाणी असून,वरच्या मजल्यावर देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच शिव व पार्वतीची सुमारे सात फूट उंच मुर्ती कोरलेल्या आहे .तर समोरच सुमारे सहा साडेसहा फूटाची पच्शिम मुखी जोगेश्वरी देवीची अष्टभुजा अतिशय सुंदर मुर्ती आहे. डोंगराच्या अखंड कातळात ही मूर्ती कोरलेली आहे. जोगेश्वरी देवीच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला असलेल्या खोलीत सहा फूट लक्ष्मीची मूर्ती कोरलेली असून याच लेण्यात राम, लक्ष्मण, सिता, दत्त, वराह, आदी देवतांचा मोठमोठ्या मूर्ती कोरलेल्या आहेत.



करोडगिरी नाका :-  निजामकाळात मराठवाडा व खान्देश यांना जोडणारा रस्ता याच डोंगरातून जात असल्याने मंदिराच्या वर तत्कालीन करोडगिरी नाक्याचे भग्न अवशेष आजही दिसतात. निजाम राजवटीत घाटनांद्रा हे मोठे व्यापारकेंद्र तसेच तालुक्याचे ठिकाण होते. या करोडगिरी नाक्यावर जकात वसुली होत असल्याचे येथिल वृद्ध आजही सांगतात.




bensound Music-https://www.bensound.com


#Jogeshwaritemple #jogeshwaridevi #Jogeshwari #Aurangabadforts #Ghatnandra
#Gopaldaud #GopalDaudvlogs #gadkille #औरंगाबादपर्याटणस्थळ #जोगेश्वरीमंदिरघाटनांद्रा #जोगेश्वरी_देवी  #marathivlogs

     


        Like ,Share & Subscribe
4 سال پیش در تاریخ 1399/07/05 منتشر شده است.
10,159 بـار بازدید شده
... بیشتر