महात्मा फुलेंवर आधारित ‘सत्यशोधक’ सिनेमा का पहावा? - Pravin Gaikwad | Satyashodhak | Marathi Movie

Sambhaji Brigade
Sambhaji Brigade
6.7 هزار بار بازدید - 7 ماه پیش - महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित
महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित “सत्यशोधक” चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. फुले दांपत्याने काळाच्या पुढचा विचार करत शिक्षण, सामाजिक सुधारणा, धर्म चिकित्सा, प्रबोधन इत्यादि विविध क्षेत्रांत केलेले काम, त्यामागचा संघर्ष, त्यांचे सहजीवन या चित्रपटात सुंदररित्या रेखाटले आहे.

संभाजी ब्रिगेडशी या चित्रपटाचे वैचारिक नाते आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके हे जिजाऊ ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षा मा.जयश्रीताई शेळके यांचे पती आहेत. तर चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक मा.निलेश जळमकर हे अकोला येथील संभाजी ब्रिगेडचे जुने कार्यकर्ते आहेत. सत्यशोधकी विचारांच्या या व अन्य सहकाऱ्यांनी एकत्र येऊन हा सुंदर चित्रपट बनवला आहे.

आजच्या काळात सामाजिक, सांस्कृतिक संघर्ष वाढीस लागला आहे. चित्रपटांच्या माध्यमातून धर्मांधतेची भावना वाढीस लावण्याचे प्रकार पहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर आलेला सत्यशोधक चित्रपट हा वैचारिक चळवळीतील तमाम कार्यकर्त्यांना एक प्रकारे उर्जा देणारा चित्रपट आहे. कर्मकांड, अवडंबर म्हणजे धर्म नसतो, तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य देतो तो खरा धर्म असतो, हा चित्रपटाने दिलेला विचार आता एक चळवळ बनला पाहिजे.

तुमच्या आमच्यातील सामान्य लोकांनी एकत्र येऊन केलेल्या या प्रयत्नाला बळ म्हणून आपण सर्वांनी आपल्या नजीकच्या सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहावा. धनवंतानी सामूहिक शो दाखवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी आपणांस विनंती आहे.

आपला
प्रविण गायकवाड
प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र
7 ماه پیش در تاریخ 1402/10/21 منتشر شده است.
6,714 بـار بازدید شده
... بیشتر