अस्सल झणझणीत नॉनव्हेज स्पेशल परफेक्ट काळा मसाला/1 कि. चे प्रमाण/गोडा मसाला/ महाराष्ट्रीयन काळामसाला.

Rupali's Food Culture
Rupali's Food Culture
479.3 هزار بار بازدید - 3 سال پیش - अस्सल झणझणीत नॉनव्हेज स्पेशल परफेक्ट
अस्सल झणझणीत नॉनव्हेज स्पेशल परफेक्ट काळा मसाला/1 कि. चे प्रमाण/गोडा मसाला/ महाराष्ट्रीयन काळामसाला.

      मसाले हे प्रत्येक पदार्थाची चव वाढवतात त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये  मसाल्यांचे महत्त्व फार मोठे आहे .आपल्या विदर्भामध्ये चमचमीत पदार्थ आणि अस्सल झणझणीत अशा भाज्या खाल्ल्या जातात विशेष करून नॉनव्हेज बनवण्यासाठी एक विशिष्ट अशा प्रकारचा नॉनव्हेज मसाला हॉटेल रेस्टॉरंट ढाब्या मध्ये वापरला जातो त्याच पद्धतीचा नॉनव्हेज बनवण्यासाठी परफेक्ट मसाल्याची रेसिपी मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. यालाच काळा मसाला आणि गोडा मासाला असेही म्हणतात. हा मसाला वापरून आपण नॉनव्हेज आणि वेजीटेरियन भाज्या अतिशय चविष्ट चटकदार बनवू शकतो . अशा पद्धतीने मसाला तयार करून ठेवल्यास वर्षभर ही खराब होत नाही आणि अगदी झटपट ऐन वेळी आपण कुठलेही नॉनव्हेज किंवा व्हेज अशी मसाला तरी ची भाजी बनू शकतो त्यासाठी फक्त दोन ते तीन मोठे चमचे हा काळा मसाला घ्यावा आणि त्यासोबत  आपल्या आवडीनुसार कांदा, टोमॅटो ,आद्रक, लसुन, कोथिंबीर आणि चविनुसार लाल तिखट घेऊन याची पेस्ट तयार करून घ्यावी व ही पेस्ट वापरून आपण अतिशय चटकदार आणि चविष्ट अशा कुठल्याही प्रकारच्या भाज्या बनवू शकतो . तर अशा पद्धतीने हा काळा मसाला आपण घरच्या घरी नक्की बनवा. रेसिपी आवडली तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडीओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. सबस्क्राईब करणे पूर्णपणे मोफत आहे. आणि कमेंट करुन प्रतिसाद नक्की द्या.
धन्यवाद🙏
1kg मसाल्याचे प्रमाण साहित्य :-
चक्रीफुल -20gm
जावित्री -15gm
नागकेशर -10gm
काळी मिरी -20gm
बडी इलायची -15gm
लवंग -15gm
त्रिफळा-10gm
दालचिनी-20gm
तेजपान-20gm
दगडफूल -15gm
खसखस -15-20gm
शाहि जिरे -15gm
पांढरे तीळ -20-30gm
सुंठ -15-20gm
हळकुंड-4-5 नग किंवा 25-30gm
धनी -250gm
सुख खोबरे -150-250gm
वाळलेली लाल मिरची-150-200gm


summer recipe. 🍨🍦🍹
summer recipe. 🍨🍦🍹





#Rupalisfoodculture
3 سال پیش در تاریخ 1400/03/25 منتشر شده است.
479,398 بـار بازدید شده
... بیشتر