रंगपंढरी Face-to-Face: Ila Bhate - Part 2

रंगपंढरी / Rang Pandhari
रंगपंढरी / Rang Pandhari
19.7 هزار بار بازدید - 4 سال پیش - "लेखकाचे शब्द सुरुवातीला तुमच्याकडे दत्तक
"लेखकाचे शब्द सुरुवातीला तुमच्याकडे दत्तक म्हणून आलेले असतात. तालमीत तुम्ही त्यांना लहान मुलासारखं आंजारा-गोंजारायचा प्रयत्न करता. पण जेव्हा तुम्ही त्यांच्यावर खरोखर आपल्या पोटच्या मुलासारखं प्रेम करायला लागता तेव्हा ते शब्द तुमचे होतात. आणि मग तुम्हाला ते सगळं आजूबाजूचं सांगतात."
- इला भाटे  

'अपराधी', 'दुसरा सामना', 'आणि थोडी ओली पाने', 'वाटचाल', 'अलविदा', 'रज्जू', 'बॅरिस्टर', 'यु-टर्न', 'पै पैशाची गोष्ट' अशी कित्येक दर्जेदार नाटकं, टीव्ही मालिका आणि अनेक चित्रपटातील सहजसुंदर अभिनयाने  गेली ३५ वर्षं इला ताई जगभरच्या मराठी रसिकांना रिझवत आल्या आहेत.

रंगमंचाबद्दल वाटणारी तीव्र ओढ, स्वतःच्या अभिनयाकडे त्रयस्थपणे पाहण्याची काटेकोर सवय, आणि आपली कला अधिक समुद्ध करण्यासाठी वाचन, ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेणं आणि मेहनतपूर्वक प्रयोग करत राहणं हे इला ताईंचे वाखाणण्याजोगे स्वभावगुण.  

'शब्द हे अभिनयाचं गर्भरूप आहेत' म्हणजे काय, आवाजाचं संगोपन, देहबोलीचा नेटका वापर आणि व्यक्तीरेखेतले बारकावे कसे टिपावेत अशा  अनेक विषयांबद्दल आजच्या भागात ऐकूया इला ताईंकडून.
4 سال پیش در تاریخ 1399/03/17 منتشر شده است.
19,734 بـار بازدید شده
... بیشتر