घरात ठेवलेल्या या 11 वस्तू घर बरबाद करतात || 11 IMP Vastu tips for Home

Real Marathi
Real Marathi
325.9 هزار بار بازدید - پارسال - घरात ठेवलेल्या या 11 वस्तू
घरात ठेवलेल्या या 11 वस्तू घर बरबाद करतात || 11 IMP Vastu tips for Home घरात ठेवलेल्या या 11 वस्तू घर बरबाद करतात 1) मृत व्यक्तींचे कपडे घरात ठेवू नये. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात, कौटुंबिक कलह निर्माण होतात. 2) देवी देवतांच्या भग्न मूर्ती म्हणजेच तुटलेल्या-फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात चुकूनही ठेवू नयेत. याने देवदोष लागतो व घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांचे मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. नको असलेल्या देवतांच्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षांखाली विसर्जित कराव्या. 3) देवी देवतांना वाहिलेली फुले, नैवेद्य या गोष्टी सहसा दुसऱ्या दिवशी प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही, तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा घरात कटकटी, भांडणे, वाद विवाद या गोष्टी नित्याच्याच बनतात. 4) घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते. ही लिंबू मिरची एक आठवड्याहून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये. तिचे वेळीच विसर्जन करावे अन्यथा फायदा ऐवजी तोटे होऊ लागतात. 5) जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नयेत. असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. 6) काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत. अन्यथा अनपेक्षित दुर्घटना घडू लागतात, सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते, आजारपण पाठी लागते, पैसा निरर्थक गोष्टींवर वाया जातो. काटेरी झाडांप्रमाणेच ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच पांढरा चिक निघतो, अशी झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत. 7) तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते. प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. 8) बंद पडलेले किंवा नादुरुस्त घड्याळ घरात पडून असेल तर चांगली चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत किंवा दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत. 9) पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीची आहे. पाकीट फाटलेले असेल किंवा खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे. पाकिटात अनावश्यक वस्तू जसे की तिकिटे, चिठ्ठ्या, बिले ठेवू नये. पाकिटात केवळ पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू ठेवाव्या. त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सातत्याने होत राहतो, पाकीट पैशांनी नेहमी भरलेले राहते. 10) पैशांचे कपाट म्हणजेच तिजोरी देखील खराब झाली असेल तर तात्काळ बदलावी. तिजोरीत पैशाशेजारी इतर अनावश्यक वस्तू ठेवू नयेत. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेक बुक, एफडी वगैरे गुंतवणुकीची कागदपत्रे तिजोरीत व्यवस्थित ठेवावीत. तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर त्याचा थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. 11) घरात कोळ्याची जाळी होऊ देऊ नये. अन्यथा घरातील व्यक्ती सतत या न त्या संकटांमध्ये घेरल्या जातात. चांगली वेळ वाईट वेळेत बदलते, घराला वास्तुदोष लागतो. 12) घरात वाहते पाणी, हिस्त्र प्राणी, युद्धप्रसंग, रडणारी किंवा शोक करणारी स्त्री असे फोटो कदापी लावू नयेत. अन्यथा घरात सतत निराशेचे वातावरण राहते, घरात एक प्रकारचा तणाव जाणवतो. 13) भंगार साहित्य, जुने व वापरात नसलेले फर्निचर आणि इतर वस्तू वेळीच घराबाहेर काढाव्यात. दीर्घकाळ या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो व घराची प्रगती मंदावते. 14) तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्याचे रॅक बनवलेले असेल आणि या रॅकला दरवाजे किंवा काचा बसवलेल्या नसतील, तर या पुस्तकांतील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो, घरात सतत कलह, वादविवाद निर्माण होतात. 15) औषधे, कीटकनाशके, बाथरूम व टॉयलेट स्वच्छ करणारी रसायने, मच्छर दूर ठेवणारे मॉस्किटो रिपेलंट या सर्व वस्तू स्वयंपाक घर म्हणजेच किचनमध्ये चुकूनही ठेवू नयेत. शक्यतो या सर्व वस्तू घरात एखाद्या सुरक्षित ठिकाणी जिथे मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवाव्यात. व्हिडिओ आवडला असेल, तर like, share व subscribe अवश्य करा. धन्यवाद! ॐ नमो नारायणा Real Marathi YouTube Channel रियल मराठी युट्यूब चॅनल
پارسال در تاریخ 1402/03/17 منتشر شده است.
325,933 بـار بازدید شده
... بیشتر