सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या | Sunya Sunya Maifileet Majhya | Devaki Pandit

Bipin Patil
Bipin Patil
402.1 هزار بار بازدید - 9 سال پیش - 'दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात हृदयनाथजींना माझ्याकडून
'दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात हृदयनाथजींना माझ्याकडून ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ हे गाणं गाऊन घ्यायचं होतं. हे गाणं त्यांनी लताबाईंच्या आवाजात आधी रेकॉर्ड केलं होतं. पण मी ते ऐकलंही नव्हतं. या कार्यक्रमासाठी माझी निवड केली तेव्हा एकच अट घातली. मी हे गाणं तुला फक्त दोनदा ऐकवीन आणि ते तू म्हणायचंस. मला ते एक प्रचंड मोठं आव्हानचं होतं. कारण हृदयनाथजींच्या चाली शंभर वेळा ऐकल्या तरी म्हणायला अवघड अशी परिस्थिती आणि इथं तर ते मला फक्त दोनदा चाल ऐकवणार होते. मनाचा हिय्या करून हो म्हटलं. त्यांनी बोलावल्या दिवशी गेले. म्हटल्याप्रमाणे त्यांनी फक्त दोनदा चाल ऐकवली. घरी परत आले. तिथून रेकॉर्डिंगच्या दिवसापर्यंत मला फक्त ‘सुन्या सुन्या’चाच ध्यास होता. किती वेळा मी ते गाणं म्हटलं असेल कुणास ठाऊक ? रेकॉर्डिंगचा दिवस उजाडला. गाणं पहिल्याच टेकमध्ये ओ.के. झालं. सगळ्या जागा बिनचूक. हृदयनाथजी पण खूष. तिथल्या तिथं शंभर रूपये काढून हातावर ठेवले. पण म्हणाले, आपण परत एकदा रेकॉर्डिंग करू या. म्हणशील का? मी काय नाही म्हणणार होते? आणि तोपर्यंत ते गाणं माझं इतकं तयार झालं होतं की मला कितीही वेळा म्हणायला सांगितलं असतं तरी ते तसंच आलं असतं. त्यामुळे दुसरही रेकॉर्डिंग झालं. तेही परफेक्ट. हृदयनाथजींनी विचारलं - तू कुठलं गाणं निवडशील ? पहिलं का दुसरं ? मी म्हटलं - पहिलं. तेव्हा त्यांनी सांगितलं - गाण्याच्या दृष्टिकोनातून दोन्हीही परफेक्ट आहेत. पण दुसर्या गाण्यात तुझी एक्सप्रेशन्स खूप छान आहेत. भावगीतामध्ये एक्सप्रेशन्सलाही, विशेषतः दृकश्राव्य माध्यमात खूप महत्व आहे. त्यामुळे मी दुसरं रेकॉर्डिंग ठेवणार आहे...’

- देवकी पंडित
सौजन्य : दै.लोकसत्ता, चतुरा (१६ मार्च २००३ )

गीत - सुरेश भट
Lyrics - Suresh Bhat
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
Music - Hridaynath Mangeshkar
9 سال پیش در تاریخ 1394/04/19 منتشر شده است.
402,127 بـار بازدید شده
... بیشتر