VBA चे Prakash Ambedkar, Aarakshan Bachao Yatra च्या माध्यमातून कोणता डाव टाकू पाहतायेत ?

BolBhidu
BolBhidu
32.7 هزار بار بازدید - 2 ماه پیش - #BolBhidu #PrakashAmbedkar
#BolBhidu #PrakashAmbedkar #ArakshanBachavYatra राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरलीय. त्यांनी २० जुलैपासून पाचव्यांदा उपोषणाला सुरुवात केली होती, सरकारला पुन्हा १ महिन्याची मुदत देत त्यांनी २४ जुलैला आपलं उपोषण मागं घेतलं. एकीकडे जरांगे यांची मराठा आरक्षणाची लढाई सुरू असताना, ओबीसी समाजाकडून मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केलाय. त्यासाठी प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी मागील महिन्यात १० दिवस उपोषण देखील केलं होतं. एकूणच आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही समाज एकमेकांविरोधात ठाकले आहेत. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी देखील या वादात उडी घेतलीय. आज २५ जुलै पासून त्यांच्या आरक्षण बचाव यात्रेला सुरूवात झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. एकूण १९ जिल्ह्यातून त्यांची ही यात्रा जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, आंबेडकरांच्या या यात्रेला महत्त्व प्राप्त झालंय. पण आंबेडकरांची ही यात्रा नेमकी कशी असणार? यातून ते काय डाव टाकत आहेत? त्यांना आरक्षण बचाव यात्रेतून नेमकं काय साध्य करायचंय? पाहुयात या व्हिडीओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: bolbhidu.com/
2 ماه پیش در تاریخ 1403/05/04 منتشر شده است.
32,746 بـار بازدید شده
... بیشتر