Ek Motha Bhau Asava | Anup Jatratkar Poetry | 17 June 2021| ajm

ajm
ajm
2.5 هزار بار بازدید - 3 سال پیش - माझे वडीलबंधू डॉ. आलोक जत्राटकर,
माझे वडीलबंधू डॉ. आलोक जत्राटकर, यांचे माझ्या आयुष्यातील स्थान खूप मोठे आहे. ज्यांना लिहीताना पाहूनच लिहायला शिकलो, बोट धरून चालायला शिकलो, इतकंच काय तर ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यातील पहिला शब्द "दादा" च म्हणालो ! माझा गुरू, आयडॉल, मेंटॉर, मार्गदर्शक सर्व कांही ! मला आठवतंय एकदा त्याला एक कथा वाचायला दिली होती. मी निपाणीत, तो कोल्हापूरात होता. रात्री उशीरा घरी आला, ती कथा पेटवून दिली आणि म्हणाला, ‘यापेक्षा नक्कीच अजून बरं लिहू शकशील !’ असा हा भाऊ. त्याचा आज वाढदिवस आणि लॉकडाऊन असल्याने त्याला जाऊन भेटूही शकत नाही म्हणूनच त्याच्याविषयीच्या माझ्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठीचा हा खटाटोप !

संगीत (विशेष आभार): Touch.-13911
Mattia Cupelli
कविता / पार्श्वाअवाज : अनुप जत्राटकर
स्टुडिओ : प्रियदर्शन्स अटेलिअर, निपाणी
3 سال پیش در تاریخ 1400/03/26 منتشر شده است.
2,540 بـار بازدید شده
... بیشتر