डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा (ऐतिहासिक पुणे करार) भाग-६

Oceanic Economics
Oceanic Economics
281 بار بازدید - 6 ماه پیش - # भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
# भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर # डॉ. भिमराव रामजी आंबेडकर # ऐतिहासिक पुणे करार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्रेष्ठ ज्ञानयोगी होते. त्यांची विद्वत्ता अद्वितीय अशी होती. मात्र यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. परदेशात जाऊन अत्यंत कठीण परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले. परदेशातील शिक्षणासाठी त्यांनी जे कष्ट घेतले त्याला तोड नाही. दररोज अठरा अठरा तास याप्रमाणे काही महिने त्यांनी सलग सतत अभ्यास केला. शिक्षणामुळेच प्रगतीच्या आणि विकासाच्या विविध संधी प्राप्त होतात. हे त्यांनी आपल्या उदाहरणावरून सिद्ध केले. या ज्ञानयोग्याने विविध विषयांचे ज्ञान मिळण्यासाठी जे अथक परिश्रम घेतले ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार (Poona Pact) हा २४ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात, अशी मागणी या कराराद्वारे करण्यात आली होती. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो. २४ सप्टेंबर १९३२ रोजी, येरवडा जेलमध्ये या दिवशी पुणे करारावर सही करण्यात आली. या दिवशी ‘पुणे करार’ कागदावर अक्षरबद्ध झाला. तत्पूर्वी ब्रिटिश सरकारने योजिलेल्या लंडनस्थित गोलमेज परिषदेच्या दोन फेर्‍या पार पडल्या होत्या आणि तिसरी फेरी होणार, हे ठाऊक झाले होते. गोलमेज परिषदेच्या पहिल्या फेरीत महात्मा गांधी अनुपस्थित होते. डॉ. आंबेडकर मात्र उपस्थित होते व त्यांनी जातिप्रथेमुळे दलितांवर होणारा अन्याय तसेच दलितांची दुर्दैवी विपन्नावस्था ही कहाणी सगळ्यांसमोर मांडली होती. "मी दलित म्हणून माझ्या जन्मापासून सर्व त्या भेदभावांची शिकार झालो आहे व म्हणूनच अस्पृश्य जातींच्या दुखण्या-गार्‍हाण्यांना मीच वाचा फोडू शकतो, दलितांचा सच्चा प्रवक्ता या नात्याने या मंडळींची कैफियत मांडण्याचा, त्यांना न्याय मिळवून देण्याचा माझा हेतू आहे व हा हेतू सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे." या आशयाचा बाबासाहेब आंबेडकरांचा युक्तिवाद सर्वार्थाने समर्थनीय होता. # डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इतर काही संबंधित विडिओ १) रुपयाची समस्या त्याचे मूळ व त्यावरील उपाय (मराठी) https://youtu.be/z4p14qrBxpg २) त्यागमूर्ती माता रमाबाई भिमराव आंबेडकर (मराठी) https://youtu.be/y0OvNcif67U ३) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - जीवनगाथा (हिंदी) https://youtu.be/vRhFZOIBD0Q ४) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा संपूर्ण भाग (मराठी) भाग-१ https://youtu.be/mGyWOdDVifo?list=PLkepAuNoeYDJO-Zyp4I8IKc1bf7qaJd0R भाग-२ https://youtu.be/CU5OH43sJMc?list=PLkepAuNoeYDJO-Zyp4I8IKc1bf7qaJd0R भाग-३ https://youtu.be/-xq6rLrRBhY भाग-४ https://youtu.be/QP4YKrsEWkY भाग-५ https://youtu.be/jXu9rJc6-Dg भाग-६ https://youtu.be/BDAu7nzUkh4 ५) The Problem Of The Rupee It's Origin and It's Solution -(Hindi) Part-1 (Introduction) https://youtu.be/7XYufrHXj0M Part-2 (Journey Of Historical Thesis) https://youtu.be/gyNqGsQdBXU Part-3 ( Dr. Ambedkar's Preface & Prof. Edwin Cannan's Foreword & Differences Between Gold Standard & Gold Exchange Standard) https://youtu.be/MawRtuWPSOg
6 ماه پیش در تاریخ 1403/01/23 منتشر شده است.
281 بـار بازدید شده
... بیشتر