झोप न येणे निद्रानाश यावर घरगुती उपाय | रात्री लवकर झोप येत नाही? | sleep disturbance home remedy

Alisha Mundada
Alisha Mundada
246.1 هزار بار بازدید - 3 سال پیش - #रात्रीलवकरझोपयेतनाही
#रात्रीलवकरझोपयेतनाही #झोपनयेणे #घरगुतीउपाय झोप न येणे निद्रानाश यावर घरगुती उपाय रात्री लवकर झोप येत नाही? sleep disturbance home remedy झोप न येण्याच्या समस्या निद्रानाशाच्या आजारामुळे उद्भवते. ताणतणावात राहणाऱ्या आणि कोणत्याही गोष्टीबद्दल काळजीपूर्वक तसंच खोलवर विचार करणाऱ्या व्यक्तींमध्ये झोप न येण्याचा त्रास जास्त प्रमाणात आढळतो. यामुळे त्यांच्या स्लीपिंग हार्मोनमध्ये बिघाड निर्माण होतो. परिणामी रात्रीच्या झोपेचे गणित पूर्णतः बिघडते. रात्री झोप लवकर येत नाही आणि सकाळी लवकर उठणे देखील कठीण होते. अपुऱ्या झोपेमुळे विविध गंभीर आजारांची लागण देखील होऊ शकते. अपुऱ्या झोपेमुळे डोकेदुखी, चिडचिड होणे, लक्ष्य विचलित होणे असे परिणाम शरीरावर दिसू लागतात. या सर्वांचा आपल्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होतात. अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकारांनाही आयते आमंत्रण मिळते. पुरेशा प्रमाणात झोप छान झाली की संपूर्ण दिवसही एकदम मस्त जातो. किमान सात ते आठ तासांची झोप मिळावी, यासाठी काही टिप्स आपण जाणून घेऊयासर्वप्रथम तुम्ही आपल्या कामाचे वेळापत्रक आखणे आवश्यक आहे. तुम्हाला किती वाजता तुमचे कार्य सुरू करायचे आणि कधीपर्यंत ते पूर्ण करायचे आहे, याचे नियोजन करा. या वेळापत्रकामध्ये सकाळी उठल्यानंतरची कामे ते रात्री झोपण्यापूर्वी कोणती कामे करायची आहेत, अशा प्रकारे सर्व माहिती नोंद करावी. यामुळे तुम्हाला स्वतःसाठी किती वेळ मिळणार आहे आणि त्यानंतर किती वेळानं झोपायचे आहे, याची स्पष्ट कल्पना तुम्हाला येईल. काही दिवस वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन केल्यास तुम्हाला आपोआपच वेळेत झोप येईल.काही जण रात्री उशिरापर्यंत मोबाइल वापरत असतात. ही अतिशय वाईट सवय आहे. कारण या सवयीमुळे तुमच्या झोपेवर दुष्परिणाम होत आहेत. काही जण मोबाइलवर गेम खेळत असतात किंवा एखादा सिनेमा/वेब सीरिज पाहत असतात. उशिरा रात्रीपर्यंत तुम्हाला झोप न येण्यामागील हे देखील मुख्य कारण असू शकते. यामुळे झोपण्यापूर्वी शक्यतो मोबाइल दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर वेळ घालवायचा असल्यास वीकेंडची निवड करावी. कारण यामुळे तुमचे कामही प्रभावित होणार नाही आणि झोप देखील पूर्ण होईल.अंथरुणात पडल्यानंतरही तुम्हाला झोप येत नसल्यास सुरुवातीस मन शांत करा आणि दीर्घ श्वास घ्या. आपले लक्ष श्वासांवर केंद्रीत करण्याचा प्रयत्न करा. दीर्घ पण शांत स्वरुपात श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरू राहू द्या. यामुळे तुमच्या मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होईल. शारीरिक तसंच मानसिक ताण कमी होईल. यामुळे तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत मिळेल. आपल्या मानसिक आरोग्यावर झोपेचे गणित अवलंबून असते. मानसिक आरोग्य निरोगी असल्यास शारीरिक आरोग्यावर सहसा कोणता परिणाम होत नाही.मन आणि मेंदू शांत होईल, असे संगीत ऐका. यामुळे रात्रीची छान झोप मिळण्यास मदत होईल. एखादे सौम्य संगीत डाउनलोड करा आणि झोपण्यापूर्वी ते ऐका. आपल्या मनाला शांत करा. मनावरील ताण कमी करा. मन तणावमुक्त झाल्यानंतर नक्कीच शांत झोप लागेल. पण झोप न येण्याची समस्या गंभीर असल्यास वेळीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार देखील पूर्ण करा.माणसाने विज्ञान व तंत्रज्ञान विकसित केल ते प्रगतीसाठी मात्र आजकाल ह्या तंत्रज्ञानाच्या अति आहारी जाणे आपल्या झोपेचे चक्र बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहे. चिंता ,मानसिक ताण तणाव याच बरोबरीने इंटरनेट व सोशल मिडीयाचा अतिवापर हे निद्रानाशाचे कारण ठरत असल्याचे सामोरे येत आहे .दिवसभराच्या धावपळीनंतर तुम्हाला रात्री नियमित सात -आठ तास झोप घेणे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे.सहा ते नऊ वयोगटातील मुलांसाठी रात्री नऊ ते ११ तास झोप आवश्यक आहे. काहींना सात ते आठ तास झोप देखील पुरेशी आहे.टीनेजर्स (युवकांसाठी ) आठ ते १० तास झोप आवश्यक आहे, काहींना सात तास झोप ठीक आहे मात्र ११ तासांपेक्षा अधिक झोपणे आरोग्यासाठी धोकादायक आहे . यौवानावस्थेत येताना इतकी झोप आवश्यक असतेच . १८ते ६४ वयोगटातील प्रौढांसाठी सात ते नऊ तास झोप गरजेची आहे.निद्रानाश टाळण्यासाठी काय कराल ?दिवसा वामकुक्षी घेणे टाळा –भरपेट जेवणानंतर बऱ्याचदा दुपारी झोप येते. छोटीशी डुलकी घेणे तुम्हाला दिवसभर प्रसन्न ठेवण्यास मदत करेल मात्र वामकुक्षी घेण्याच्या सवयीमुळे तुमच्या रात्रीच्या झोपेचे चक्र मात्र बिघडून, परिणामी दुसऱ्या दिवशी तुम्ही निरुत्साही रहाल .रात्री भरपूर खाणे टाळा –चांगल्या आरोग्यासाठी सर्वात जास्त सकाळचा नाश्ता , त्याहून थोडे कमी दुपारचे जेवण व सर्वात कमी रात्रीचे जेवण घेणे हितावह आहे. रात्रीचे जेवण भरपेट व अतिमसालेदार देखील असू नये. यांमुळे पित्त व पचनाचे विकार होऊन रात्रीची झोप बिघडू शकते. म्हणून झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास अगोदर जेवणेच हितावह आहे. धुम्रपान व मद्यपान टाळा –झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यामुळे झोप येण्यास मदत होते हा चुकीचा समज आहे. मद्यपानामुळे तुम्हाला झोप आली तरीही ती सुखकारक झोप नसून यामुळे तुम्हाला रात्री सारखी जाग येईल. तसेच धुम्रपानामुळे देखील आरोग्यदायी झोप मिळत नाही . सिगारेटमधील ‘निकोटीन’ सारख्या घटकामुळे झोपेचे चक्र बिघडते.चहा / कॉफीचे सेवन टाळा –चहा व कॉफीत आढळणाऱ्या ‘ कॅफिन’ या उत्तेजक घटकामुळे तुम्ही झोप टाळू शकता . तसेच विविध पेयांमध्ये आढळणाऱ्या कॅफिनमुळे रात्री वारंवार मुत्रविसर्जनासाठी शौचालयात जाणे वाढते . त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी चार ते सहा तास अगोदर चहा , कॉफी यासारखी पेय घेणे टाळा .खूप पाणी पिऊ नका –पोट स्वच्छ होण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी पिणे हे हितावह आहे. मात्र रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी प्यायल्याने मुत्रविसर्जनासाठी वारंवार उठावे लागल्यामुळे झोपमोड होऊ शकते . Alice weight loss clinic talks on problem of insomnia and lack of sleep.
3 سال پیش در تاریخ 1400/02/10 منتشر شده است.
246,134 بـار بازدید شده
... بیشتر