तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाच्या अर्थच्छटा लिहा

Bhagwattekale.blogspot
Bhagwattekale.blogspot
188 بار بازدید - ماه قبل - Download इयत्ता दहावी स्वाध्याय App
Download इयत्ता दहावी स्वाध्याय App link ( https://play.google.com/store/apps/de... )

बोलतो मराठी स्वाध्याय लिंक ( https://swadhyaybookspdf.com/2024/06/... )












'तुम्ही शहाणे आहात' या वाक्यातील 'शहाणे' या शब्दाच्या अर्थच्छटा लिहा.

उत्तर :

'तुम्ही शहाणे आहात', असे अनेकदा म्हटले जाते. त्या वेळी ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणा वर, त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो. आई आपल्या मुलाला, "बाळा तू शहाणा आहेस" असे म्हणते, तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलाबद्दल अशीच खात्री असते. आपला मुलगा विवेकी आहे. तो वाईट वागणार नाही, इतरांना दुःख देणार नाही, असा तिला विश्वास असतो. कधी कधी या उद्गारातून आई आपल्या मुलामध्ये चांगुलपणाचा भाव निर्माण करीत असते.

मात्र प्रत्येक वेळेला ' तुम्ही शहाणे आहात', या वाक्याचा असा सरळ, प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच, असे नाही. काही व्यक्ती मुळातच लबाड असतात. चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात. कधी कधी तर काही माणसांना खरोखरच साधी, सोपी गोष्टही कळत नाही. कितीही समजावून सांगितले, तरी त्यांना ते समजतच नाही. मग त्यांना 'तुम्ही शहाणे आहात', असे ऐकवावे लागते. येथे 'शहाणे' हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात 'तुम्ही अतिशहाणे आहात', म्हणजे 'तुम्ही मूर्ख आहात' असेच म्हणत असतो.












तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाच्या अर्थच्छटा लिहा,
#तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाच्या अर्थच्छटा लिहा,
तुम्ही_शहाणे_आहात_या_वाक्यातील_शहाणे_या_शब्दाच्या_अर्थच्छटा_लिहा,
#तुम्ही_शहाणे_आहात_या_वाक्यातील_शहाणे_या_शब्दाच्या_अर्थच्छटा_लिहा,
ماه قبل در تاریخ 1403/03/17 منتشر شده است.
188 بـار بازدید شده
... بیشتر