भोगीची भाजी कशी बनवावी|Bhogichi Bhaji Recipe marathi| sankrant special Recipe|भोगी भाजी मराठी रेसिपी

Pihu Recipes and Arts
Pihu Recipes and Arts
332 بار بازدید - 2 سال پیش - भोगीची भाजी कशी बनवावी|Bhogichi Bhaji
भोगीची भाजी कशी बनवावी|Bhogichi Bhaji Recipe marathi| sankrant special Recipe|भोगी भाजी मराठी रेसिपी
भोगीची भाजी रेसिपी मराठी | bhogichi bhaji recipe in marathi
भोगीची भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे भोगीची भाजी विशेषतःमहाराष्ट्रात बनवली जाते

भोगीच्या भाजी साठी लागणारे साहित्य | bhogi recipe ingredients marathi
बोर
पेरू
ऊस
शेंगदाणे
हरभरे
पावटा
गाजर
कांद्याची पाथ
वांगे
घेवडा
वाटाणा
फ्लावर
तीळ
खोबरे
जिरे
मोहरी
लसूण
कढीपत्ता
कोथिंबीर
लाल मिरची पावडर
गरम मसाला
गोडा मसाला
चवीनुसार मीठ.


भोगीची भाजी बनवण्याची पद्धत | bhogichi bhaji recipe step by step procedure
सर्वप्रथम कढई मध्ये तेल टाकून जिरे मोहरी लसूण कढीपत्ता याची फोडणी द्यावी लालसर होईपर्यंत त्याला भाजावे नंतर तीळ शेंगदाणे व खोबरे याची पेस्ट बनवून लालसर होईपर्यंत परतावे, पेस्टला तेल सुटेपर्यंत परतावे नंतर त्यामध्ये थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकावे एक चमचा गरम मसाला गरम मसाला नसेल तर गोडा मसाला टाकावे आणि नंतर आपण आणलेल्या सर्व भाज्या (हरभरा, पावटा, गाजर, वाटाणा, ऊस, पेरू ,बोर इ) एकत्रित करून त्या फोडणीमध्ये टाकाव्या सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून नंतर त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून व मीठ कोथंबीर टाकून उकळा येईपर्यंत शिजवावे आपल्या भोगीची भाजीची रेसिपी तयार .

न खाई भोगी तो सदारोपी अशी म्हण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या म्हणीचा अर्थ असा आहे की भोगीची भाजी जर आपण खाली नाही तर आपण वर्षभरात नेहमी आजारी पडत राहू त्यामुळे भोगीच्या भाजीला विशेष असे महत्त्व आहे
2 سال پیش در تاریخ 1401/10/23 منتشر شده است.
332 بـار بازدید شده
... بیشتر