Ramabai Bhimrao Ambedkar Boigraphy In Marathi | त्यागमूर्ती रमाबाई यांची जीवन गाथा

The Greatest
The Greatest
145.8 هزار بار بازدید - 6 سال پیش - Ramabai Bhimrao Ambedkar Boigraphy In
Ramabai Bhimrao Ambedkar Boigraphy In Marathi

त्यागाची प्रतीक बाबासाहेबांची प्रेरणा कोट्यवधी दिन दुबळ्या अस्पृश्यांची माता बाबासाहेबांची प्रिय रामू करुणेचा अथांग महासागर म्हणजेच माता रमाई . रमाई यांच्या जीवन म्हणजे दुःख दारिद्र्य,कष्ट ,यातना,उपासमार त्यांच्या जीवनात कधीच सुख शांती समृद्धी आली नाही त्यांनी आपल संपूर्ण जीवन बाबासाहेबांनी निवडलेल्या कार्याला समर्पित केलं तेव्हा आज जाणून घेऊया त्या महान मातेच्या कार्याला जिच्या टी त्यागाने आणि बाबासाहेबांच्या कार्याने उधारली कोटी कुळे....
रमाबाई भीमराव आंबेडकर ७ फेब्रुवारी  १८९८ ला दापोली तालुक्यातील वणद येथे झाला . रुख्मिणी आणि भिकाजी धोत्रे हे त्यांचे आई वडील ... लहान वयातच रमाबाईंच्या आई वरल्या दुःखाचा तो डोंगर पार होतो न होतो तर लगेचच ३ ते ४ महिन्यात त्यांचे वडीलही हे जग सोडून गेले इवल्याश्या रमाव र घराची सगळी जबाबदारी आली. बाबासाहेब हे ,१९१३ ते १९१६ या तीन वर्षात अमेरिकेला व जुलै १९१६ ते १९१७ या वर्षात ते जर्मनी येथे उच्च शिक्षण घेत होते. १९१३ मध्ये रामजी सुभेदार यांचा मृत्यू झाला .रमेशचा मृ्त्यू. ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू  मुलगी इंदू, असे एका पाठोपाठ असे अनेक दुःख घरात झाले. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही.
गोलमेज परिषदेत विचारविनिमय रॅमसे makdolanld यांनी बाबासाहेबांनी सुचविलेल्या मुद्यांचा विचार केला आणि अस्पृश्याना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचा विचार केला तेव्हा गांधी सरकार ने विरोध केला एवढच नाही तर गांधी येरवडा येथे आमरण उपोषणाला बसले तेव्हा बाबासाहेबांना धमक्या येऊ लागल्या या धास्तीने रमाबाई पार कोसळल्या त्यांच्या आजाराने मोठं स्वरूप घेतलं त्यांचा टिबी हा वाढतच गेला  . त्यांनी खान पिन सोडलं बाबासाहेब जेव्हा काही देत तेच त्या खात .
बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली.पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्‍या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले.
Ramabai Bhimrao Ambedkar

Ramabai Bhimrao Ambedkar Boigraphy In Marathi  Ramabai Bhimrao Ambedkar tyagmurti ramabai  Babasaheb Ambedkar Ramabai Ambedkar Movie Kunku Lavil Raman  Nau Kotichi Mata Ramai
6 سال پیش در تاریخ 1397/11/17 منتشر شده است.
145,863 بـار بازدید شده
... بیشتر