Samangad Fort Gadhinglaj Kolhapur | किल्ले सामानगड | दुर्गवैभवातील एक महत्त्वाचा किल्ला#samangadfort

Priyanka Desai
Priyanka Desai
215 بار بازدید - 3 ماه پیش - इतिहास अनुभवायचा आहे.. निसर्गाची भव्यता
इतिहास अनुभवायचा आहे.. निसर्गाची भव्यता अनुभवायची आहे.. तर आपल्या पूर्वजांचा वारसा असलेले गडकिल्ले यांच्यासारखे दुसरे पर्यटन स्थळ असू शकत नाही.. सामानगड कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात निसर्गाच्या सानिध्यात वसलेला एक समृद्ध गड म्हणजेच सामानगड.. इतिहास तज्ञांच्या मते इतर किल्ल्यांना मदत पुरवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा त्यामुळेच या किल्ल्याचे नाव सामानगड असे पडले असावे.. सामानगडावर अद्भुत आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा विहिरी आहेत.. सामानगडावर अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यावर पुढे जाताच काहीच अंतरावर सुंदर पायऱ्या असलेली, शिल्पकलेचा अद्भुत नजराणा असलेली "सात कमानी असलेली विहीर "दिसते. याला 'कमान बाव' सुद्धा म्हटले जाते.. यास याच विहिरीप्रमाणे साखर विहीर यासारख्या अनेक विहिरी गडावर पाहायला मिळतात... त्याचबरोबर येथे असलेली "अंधार कोठडी" देखील अचंबित करून जाते पूर्वी असे म्हटले जात होते की येथे कैद्यांना ठेवले जात असावे म्हणूनच याला अंधार कोठडी असे म्हटले जाते.. इतिहासाची साक्ष देणारा हा सामानगड अनेक पर्यटकांना आपलंसं करतो.. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या शौर्याची साक्ष सामानगड देतो. सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे इतर ६ सहकारी बेहलोल खानच्या लाखो सैन्यांवर चालून गेले. खानाच्या सैन्यावर सात मराठे ज्या ठिकाणाहून दौडत गेले ते ठिकाण म्हणजेच सामानगड. छत्रपती शिवाजी महाराजांवर असणाऱ्या निष्ठेपायी येथूनच 'वेडात मराठे वीर दौडले सात' याची मुहूर्त मेढ रोवली गेली.. तुम्ही देखील कोल्हापुरात गेल्यावर गडहिंग्लज तालुक्यात कधी जाणे झालेच .. तर संपूर्ण दक्षता घेऊन या गडाला नक्की भेट द्या.. #samangadfort #gadhinglaj #chhatrapatishivajimaharaj #kolhapur #gadhinglaj #kolhapur #samangadkilla #gadhinglajtouristplaces #samangad #gadhinglaj #pratapraogujar #vedatmaratheveerdaudalesaat #pratapraogujarhistory #maharshtrahistoricalplace #maharashtra
3 ماه پیش در تاریخ 1403/03/29 منتشر شده است.
215 بـار بازدید شده
... بیشتر